Monday, June 8, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

भीमा कोरेगाव विजयसस्तंभ राष्ट्रीय स्मारक झाले पाहिजे – रामदास आठवले


पुणे : एक जानेवारीला देशभरातून आंबेडकरी अनुयायी लाखोंच्या संख्येने भीमा कोरेगाव विजयस्तंभास भेट देण्यासाठी येत असतात. गेल्या बऱ्याच वर्षापासून येथे राष्ट्रीय स्मारक होण्याची मागणी अनेक संघटना आणि कार्यकर्ते करीत आहेत .त्याची दखल शासनाने घेण्यासाठी मी पाठपुरावा करणार असून लवकरच भीमा कोरेगाव येथे राष्ट्रीय स्मारक झाले पाहिजे अशी मागणी करीत आहे .व ते लवकर होण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री खासदार रामदास आठवले यांनी केली .ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते .

या पत्रकार परिषदेस प्रदेश संघटक सचिव परशुराम वाडेकर,शहराध्यक्ष संजय सोनवणे यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते .

पुढे ते म्हणाले की ,लोकसभेला आम्ही दोन जागा मागितल्या होत्या ,विधानसभेला ही आम्ही जागा मागितला परंतु दिल्या नाहीत .त्यामुळे आता एक मंत्रिपद शिल्लक आहे ते रिपब्लिकन पार्टीला मिळावे अशी महायुतीकडे मागणी केल्याचे आठवले यांनी सांगितले .
पुण्यात रिपब्लिकन पक्षाची फार मोठी ताकत आहे .मागील वर्षी आम्हाला उपमहपौर पद दिले होते परंतु येत्या महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला महापौरपद मिळावे अशी आग्रही मागणी रामदास आठवले यांनी केली आहे .
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींचा प्रमुख म्हणून वाल्मीक कराड याचे नाव पुढे येत आहे. यामध्ये कराडचा हात असल्याचा आरोप देशमुख कुटुंबियांकडून केला जात आहे. त्यामुळे या खून प्रकरणात कराड याच्या नावाचा समावेश करुन त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.

‘कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री आठवले बुधवारी पुण्यात आले होते. व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे त्यांनी पत्रकार परिषद घेत आठवले यांनी विविध विषयांवर भाष्य केले. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी होत असलेल्या दिरंगाईबद्दल आठवले यांनी नाराजी व्यक्त केली. खुनाची घटना उघडकीस आल्यानंतर दोन ते तीन दिवसात तपास करुन पोलिस आरोपींना पकडतात. मग देशमुख खून प्रकरण होऊन २३ दिवस झाल्यानंतरही तीन आरोपी अद्यापही पोलिसांना सापडत नाहीत, हे गृह खात्याचे अपयश आहे.

देशमुख खून प्रकरणात वाल्मीक कराड याचाच मुख्य हात असल्याचा आरोप केला जात आहे. राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाने कराड याला खंडणीच्या प्रकरणात अटक केली आहे. त्याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करुन पुढील तपास झाला पाहिजे.
बीड जिल्ह्यात शांतता ठेवायची असेल तर कराडला शिक्षा झालीच पाहिजे, असेही ते म्हणाले.

बीड मधील खून प्रकरण म्हणजे मराठा विरूद्ध वंजारी किंवा ओबीसी विरूद्ध वंजारी असा वाद नाही. कंपन्यांना दमबाजी करत खंडणी मागणाऱ्यांच्या विरोधातील हा लढा आहे. अशा पद्धतीने दमबाजी करत खंडणी मागितली जात असेल तर एकही उद्योग जिल्ह्यात येणार नाही, अशी भिती रामदास आठवले यांनी व्यक्त केली. ही घटना माणुसकीसाठी कलंक असून याची सविस्तर चौकशी होऊन दोषींवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्याची आवश्यकता नाही

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून चर्चेत असलेला वाल्मीक कराड हा  मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संबधित असल्याने त्याला पाठीशी घातले जात आहे. मुंडे यांचा राजीनामा घेऊन त्यांना बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली जाऊ नये, अशी मागणी विविध स्तरातून केली जात आहे. याबाबत आठवले यांना विचारले असता, ते म्हणाले पोलिसांनी कराडला अटक केली आहे. कृषीमंत्री मुंडे यांचा या प्रकरणाशी संबध नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याची आवश्यकता नाही. देशमुख खून प्रकरणात जे दोषी असतील त्यांना अटक करुन कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनीच केली असल्याचे आठवले म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading