केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप
पुणे: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व रिपाइं पुणे शहर सरचिटणीस शाम सदाफुले यांच्या वाढदिवसा निमित्त लक्ष्मीनगर, येरवडा येथील निवारा अनाथ मुलांच्या निवासी शाळेत मुलांना शालेय साहित्य वाटप व अल्पोहार वाटप करण्यात आला.
याप्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस शाम सदाफुले, सामाजिक कार्यकर्ते संतोष भोसले, लखन परदेशी, मिलिंद चलवादी, नितीन थोरात, सागर सोनवणे, शिवाजी वाल्हेकर, विशाल पवार, किरण वाल्हेकर, रुपेश घोलप, विनोद राठोड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन जीवन तरुण मंडळाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मिळून केले होते.
