Monday, June 8, 2026
Latest NewsPUNE

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मनात ध्येय निर्माण करा – पोलीस उपायुक्त विजयकांत सागर

 

मुंबई : आता पासूनच मुलांच्या मनामध्ये धैय्य निर्माण केल्यास मोठ्यापणी त्यांना हवे त्या क्षेत्रात यश प्राप्त करता येते. आजच्या तंत्रज्ञानाची माहिती मुलांना असून बुद्धीबळ स्पर्धेत विश्वविजेता डोमराजू गुकेश यांने वयाच्या अकराव्या वर्षी विश्वविजेता होण्याचे स्वप्न पाहिले होते. ते त्याने वयाच्या अठराव्या वर्षी प्रत्यक्षात आणून दाखविले. त्यामुळे मुलांच्या मनात मोठे होण्याचे स्वप्न बिंबवणे गरजेचे आहे. असे वक्तव्य परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी मुलुंड येथे केले.

मुलुंड पुर्व येथील सौ. लक्ष्मीबाई इंग्लिश मिडीयम हायस्कुलच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त विजयकांत सागर, नाट्य चित्रपट अभिनेत्री अमृता सुभाष, निर्माती, दिग्दर्शिका शमिष्ठा राऊत उपस्थित होते.

या कार्यक्रमात पहिली ते चौथी पर्यंतच्या मुलांनी नृत्य करुन उपस्थितांची मने जिंकली. यावेळी मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणुन वर्षभर घेण्यात आलेल्या वेगवेगळ्या स्पर्धेत यश संपादन करणा-या विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading