Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

अनिरुद्ध रांजेकर यांना उत्कृष्ट अभिनयासाठी रौप्यपदक

पुणे :  सांकृतिक कार्य संचालनालयातर्फे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्ध्येमध्ये पुण्यातील अनिरुद्ध रांजेकर यांना उत्कृष्ट अभिनयासाठी रौप्यपदक मिळाले आहे . पिंपरी-चिंचवड केंद्रातून जगदीश नगर गृहरचना या संस्थेच्या ‘नेव्हर माईंड’ या नाटकामध्ये त्यांनी काम केले होते. तसेच या नाटकाला द्वितीय पारितोषिक जाहीर झाले आहे.

या विषयी आपल्या भावना व्यक्त करताना अनिरुद्ध रांजेकर म्हणाले, “आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. राज्यनाट्य स्पर्धा २०२४ मध्ये मला अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून रौप्य पदक मिळाले. अभिनयासाठी मिळालेली ही आजपर्यंतची ही सर्वोत्कृष्ट पावती आहे. दिग्दर्शनासाठी मिलिंद कुलकर्णी यांना द्वितीय पारितोषिक मिळाले आणि आमच्या नाटकाला द्वितीय पारितोषिक मिळाले आणि अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. त्याचे सर्व श्रेय आमच्या सर्व टीमचे आहे. त्यांच्या सहकार्याशिवाय हे अशक्य होते. सर्व टीमचे मी मनापासून अभिनंदन करतो.”

या वर्षीच्या स्पर्धेमध्ये राज्यभरातून विविध संस्थातर्फे एकूण १७ नाट्यप्रयोग सादर झाले आणि मुकुंद मराठे, राहुल वैद्य, आणि अनुया बाम यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. सदर नाट्य स्पर्धा ही पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रामकृष्ण मोरे सभागृहात नुकतीच संपन्न झाली. अनिरुद्ध रांजेकर हे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यायसायिक आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading