खंडोबाच्या जेजुरीत महा अंनिस पुणे तर्फे 314 व्या महीलेची जटेतून मुक्तता
पुणे : संजीवनी दत्तात्रय विभाड (वय67 वर्षे) रा .मावडी कडेपठार ता. पुरंदर यांच्या डोक्यात गेली 15वर्षा पासून तब्बल सहा फूट लांबीची जट होती. धार्मिक श्रद्धेपोटी व दैवी भिती मुळे या ताई जट काढून टाकण्यास तयार नव्हत्या.पण त्यांचा मुलगा योगेश विभाड याने महा. अंनिस च्या कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांचे यु ट्यूब वरील जट निर्मूलनाचे व्हिडियो पाहून महा. अंनिस राज्य कार्यकारी समिती सदस्या नंदिनी जाधव यांच्याशी संपर्क साधला व आपल्या आईच्या डोक्यातील जट काढण्या विषयी विनंती केली.
योगेश ची स्वतःची तीन सलून असून तो गेली दहा वर्षे आपल्या आईची जट काढून टाकण्या साठी प्रयत्नशील होता. पण समाजाच्या दबावामुळे व आईच्या मनातील दैवी भिती मुळे तो स्वतः ही जट काढू शकला नव्हता. आईच्या डोक्यात इतकी मोठी जट असल्यामुळे जवळचे नातेवाईक ही योगेश च्या कुटुंबाशी दुरावा ठेऊन होते. आज महा .अंनिस पुणे जिल्ह्याची टीम योगेशच्या घरी पोहोचली. आज दत्त जयंती आणि वर शनिवार असल्याने शेजारचे लोक म्हणाले , “आज नको उद्या काढा ही जट! पण संजीवनी ताईंना अंनिस ची टीम आपली जटे तून मुक्तता करण्यासाठी चक्की घरी आलेली पाहून त्या स्वतः हुन म्हणाल्या , “आजचाच मुहूर्त चांगला आहे! यांना देवानेच जट काढायला पाठवले आहे.” केवळ पाचच मिनिटात नंदिनी जाधव यांनी जट कापून काढली.
योगेश म्हणाला, गेली 15वर्षे माझ्या आईच्या डोक्यावरील,शरीरावरील आणि मनावरील ओझे नंदिनी ताईंनी पाच मिनिटात उतरवले. जट कापताच संजीवनी ताईंचे डोळे अक्षरशः भरून आले माझ्या मनातील सर्व भिती आज पळून गेली. आणखी दोघी तिघी बायकांचे प्रबोधन करण्याचे संजीवनी ताईंनी सांगितले. या वेळी महा अंनिस चे राज्य कार्यकारी समिती सदस्य मिलिंद देशमुख,अनिल वेल्हाळ, मंगेश शहा, रंगनाथ नेवसे, विजय विभाड, ऋतुजा विभाड, योगेश विभाड या सर्वाच्या उपस्थितीत नंदिनी जाधव यांनी जट निर्मूलन करण्यात आले.
