साई लाइफ सायन्सेस लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री योजना 11 डिसेंबर २०२४ पासून सुरू
मुंबई : साई लाइफ सायन्सेस लिमिटेड (“साई लाइफ” किंवा “द कंपनी”) या कंपनीची प्राथमिक समभाग विक्री (“ऑफर”) येत्या 11 डिसेंबर २०२४पासून सुरू होणार आहे. कंपनीने या संदर्भात प्रस्ताव सादर केला आहे.
या ऑफरमध्ये एकूण 950 कोटी रुपयांच्या नव्या इक्विटी शेअर्सचा (“फ्रेश इश्यू”), तसेच काही विद्यमान भागधारकांकडील (“सेलिंग शेअरहोल्डर्स”) 3,81,16,934 इक्विटी शेअर्सचा (“ऑफर फॉर सेल”) समावेश आहे. (“टोटल ऑफर साईझ”)
या आयपीओमधून मिळणाच्या निधीचा विनियोग आपल्या 720 कोटी रुपयांच्या कर्जाची संपूर्ण वा अर्ध परतफेड करण्यासाठी आणि उर्वरीत रकमेचा विनियोग इतर कॉर्पोरेट स्वरुपाच्या खर्चासाठी करण्याचा कंपनीचा मनोदय आहे. (“ऑबजेक्ट्स ऑफ द ऑफर”)
‘ऑफर फॉर सेल’मध्ये, साई क्वेस्ट सिन प्रायव्हेट लिमिटेड (“प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर”) यांच्याकडील 64,54,780 इक्विटी शेअर्स, टीपीजी एशिया व्हीटू एसएफ पीटीई लि. यांच्याकडील 2,31,59,368 इक्विटी शेअर्स, एचबीएम प्रायव्हेट इक्विटी इंडिया यांच्याकडील 62,10,186 इक्विटी शेअर्स (एकत्रितपणे, “इन्व्हेस्टर सेलिंग शेअरहोल्डर”); त्याचप्रमाणे, भारती श्रीवरी यांच्याकडील 6,50,000 इक्विटी शेअर्स, अनिता रुद्रराजू नंद्याळा यांच्याकडील 5,00,000 इक्विटी शेअर्स, राजू पेनमस्ता यांच्याकडील 5,00,000 इक्विटी शेअर्स, डॉ. डर्क वॉल्टर सरटॉर यांच्याकडील 2,50,00 इक्विटी शेअर्स, जगदीश विश्वनाथ डोरे यांच्याकडील 2,45,100 इक्विटी शेअर्स, राजगोपाल श्रीरामा टट्टा यांच्याकडील 62,500 इक्विटी शेअर्स, के पांडू रंगा राजू यांच्याकडील 80,000 इक्विटी शेअर्स समभाग आणि वेंकट नरसिंह शास्त्री यांच्याकडील 5,000 इक्विटी शेअर्स (सर्व मिळून “अदर सेलिंग शेअरहोल्डर्स”) एवढ्या शेअर्सचा समावेश आहे.
अॅंकर इन्व्हेस्टर श्रेणीतील गुंतवणूकदारांसाठी बोली लावण्याचा दिवस मंगळवार, 10 डिसेंबर 2024 हा ठरविण्यात आला आहे. इतर गुंतणूकदारांसाठी बुधवार, दि. 11 डिसेंबर 2024 ते शुक्रवार, दि. 13 डिसेंबर 2024 ही मुदत देण्यात आली आहे. (“बिड डिटेल्स”)
या आयपीओसाठी इक्विटी शेअर्सचा किंमतपट्टा 522 रुपये ते 549 रुपये असा निश्चित करण्यात आला आहे. गुंतवणूकदारांना किमान … शेअर्ससाठी व त्यानंतर …. शेअर्सच्या पटीत बोली लावता येईल.
हे इक्विटी शेअर्स कंपनीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमार्फत 5 डिसेंबर 2024 रोजी हैदराबाद येथील रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, तेलंगणा (“आरओसी”) यांच्याकडे सादर केले जात आहेत.
रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे ऑफर केले जाणारे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“बीएसई”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“एनएसई”, ‘बीएसई’सोबत एकत्रितपणे “स्टॉक एक्स्चेंज”) या स्टॉक एक्सचेंजेसमध्ये सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. ऑफरच्या उद्दिष्टांसाठी, एनएसई हे स्टॉक एक्सचेंज नियुक्त करण्यात आले आहे. (“लिस्टिंग डिटेल्स”)
कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड (पूर्वाश्रमीची आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड), जेफरीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि मॉर्गन स्टॅनले इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्या या ऑफरसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर (“बीआरएलएम”) आहेत.
या प्रेस रीलिजमध्ये ज्या विशिष्ट संज्ञांची व्याख्या नमूद केली नसेल, त्यांचा अर्थ आरएचपीमध्ये विहित केल्याप्रमाणे घ्यावा.
‘सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स’मधील नियम क्र.31मध्ये नमूद केल्याप्रमाणे, सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स (रेग्युलेशन) नियम, 1957च्या नियम 19(2)(बी), सुधारित (“एससीआरआर”) नुसार ही ऑफर देण्यात येत आहे. ‘सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स’मधील नियमावली 6(1) नुसार, ही ऑफर ‘बुक बिल्डिंग’ प्रक्रियेद्वारे केली जात आहे. यामध्ये निव्वळ ऑफरच्या किमान 50 टक्के भाग हा पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (“क्यूआयबी” आणि त्यांच्यासाठीचा “क्यूआयबी पोर्शन”) प्रमाणानुसार वाटपासाठी उपलब्ध असेल. कंपनी लीड व्यवस्थापकांशी सल्लामसलत करून ‘क्यूआयबी पोर्शन’च्या 60 टक्क्यांपर्यंतचा हिस्सा ‘अँकर इन्व्हेस्टर्स’ना विवेकाधीन आधारावर वाटप करू शकेल आणि त्यातील एक तृतियांश भाग हा केवळ देशांतर्गत म्युच्युअल फंडांसाठी राखीव ठेवण्यात येईल, हे यामध्ये गृहीत धरण्यात आले आहे. ‘अँकर इन्व्हेस्टर्स’ना देण्यात येणाऱ्या किंमतींपेक्षा अधिक रकमेची बोली देशांतर्गत म्युच्युअल फंडांकडून सादर होणे अपेक्षित आहे. ‘आयपीओ’ला कमी प्रतिसाद मिळाला किंवा ‘अँकर इन्व्हेस्टर्स’ना शेअर्सचे वाटप झाले नाही, तर उर्वरीत इक्विटी शेअर्स ‘नेट क्यूआयबी पोर्शन’मध्ये समाविष्ट केले जातील.
याशिवाय, ऑफर प्राईसच्या बरोबरीची किंवा त्यापेक्षा जास्त रकमेची वैध बोली आल्यास, ‘नेट क्यूआयबी पोर्शन’चा 5 टक्के भाग केवळ म्युच्युअल फंडांना प्रमाणित आधारावर वाटपासाठी उपलब्ध असेल आणि उर्वरित ‘नेट क्यूआयबी पोर्शन’ हा म्युच्युअल फंडांसह सर्व ‘क्यूआयबी बोलीदारां’साठी (अँकर इन्व्हेस्टर्सव्यतिरिक्त) प्रमाणित आधारावर वाटपासाठी उपलब्ध असेल. म्युच्युअल फंडांची एकूण मागणी निव्वळ क्यूआयबी भागाच्या 5 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास, म्युच्युअल फंड भागातील उर्वरित समभाग क्यूआयबी भागामध्ये जोडले जातील आणि क्यूआयबीच्या प्रमाणात त्यांचे वाटप केले जाईल.
याशिवाय, या ऑफरमधील किमान 35 टक्के शेअर्स बिगर-संस्थागत बोलीदारांना वाटप करण्यासाठी उपलब्ध असतील, उदा. (अ) ज्या अर्जदारांनी 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आणि 10 लाख रुपयांपेक्षा कमी रकमेची बोली लावली असेल, अशांना बिगर-संस्थात्मक बोलीदारांसाठी उपलब्ध असलेल्या शेअर्सचा एक तृतीयांश भाग आरक्षित करून देण्यात येईल, आणि (ब) ज्या 10 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची बोली लावली असेल, अशांना बिगर संस्थात्मक बोलीदारांसाठी उपलब्ध असलेल्या शेअर्सचा दोन तृतीयांश भाग आरक्षित करून देण्यात येईल. या दोन्ही श्रेणींपैकी कोणत्याही श्रेणीत शिल्लक राहिलेले शेअर्स बिगर-संस्थागत बोलिदारांमधील इतर उप-श्रेणीसाठी काढून देण्यात येतील. मात्र याकरीता या बोली ऑफर किंमतीइतक्या किंवा त्यापेक्षा अधिक मूल्याच्या असायला हव्यात. तसेच सेबी आयसीडीआरच्या नियमांनुसार, किरकोळ वैयक्तिक बोलीदारांना वाटपासाठी 35 टक्क्यांहून कमी शेअर्स उरणार नाहीत, हेही बघावे लागेल. यामध्येही ऑफर किमतीइतक्या वा त्यापेक्षा जास्त रकमेच्या बोली येणे अपेक्षित असेल.
सर्व बोलीदारांना (अँकर इन्व्हेस्टर्स वगळता) ‘अॅप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाउंट’ (“एएसबीए”) प्रक्रियेचा वापर करणे अनिवार्य आहे. आपल्या संबंधित एएसबीए खात्याचा तपशील आणि ‘आरआयबी यूपीआय मेकॅनिझम’ वापरत असल्यास ‘यूपीआय’चा आयडी त्यांना याकरीता द्यावा लागेल. त्यानुसार त्यांच्या संबंधित बोलीची रक्कम ‘सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँकां’द्वारे (“एससीएसी”) किंवा यूपीआय यंत्रणेंतर्गत प्रायोजक बँकेद्वारे, संबंधित बोली रकमेच्या मर्यादेपर्यंत ब्लॉक केली जाईल. ‘अँकर इन्व्हेस्टर्स’ना ‘एएसबीए’ प्रक्रियेद्वारे ऑफरमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही. अधिक माहितीसाठी आरएचपीच्या पृष्ठ क्रमांक 393 वरील ऑफर प्रोसिजर हा तपशील पाहावा.
