Monday, June 8, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी पूर्वी पक्षातील ‘ही’ कीड दूर करा; भाजप कार्यकर्त्यांनी फडणवीस यांच्याकडे मागणी

मुंबई:  भारतीय जनता पक्षात राहून पक्षविरोधी कारवाया करणारे विधान परिषदेतील आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांना पक्षातून काढून टाका. मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी पूर्वी पक्षातील ही कीड दूर करा, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

लोकसभा निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांच्याऐवजी रणजीतसिंह निंबाळकर यांना माढा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यामुळे मोहिते पाटील घराणे भाजपापासून दूर झाले. धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारीच्या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवली आणि त्यात ते विजयी देखील झाले. 

या घडामोडीत विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र असलेले रणजीतसिंह मोहिते पाटील तांत्रिकदृष्ट्या भाजपमध्येच राहिले. मात्र, त्यांच्या पत्नी आणि मुलाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान पक्षविरोधी प्रचार केल्याचा आरोप भाजपचे माळशिरस मतदारसंघातील माजी आमदार राम सातपुते यांनी यापूर्वीच केला आहे. पक्षाचे प्रदेश पदाधिकारी संतोष पाटील यांनी या आरोपाचा पुनरुच्चार केला आहे. 

रणजीत सिंह मोहिते पाटील ही पक्षाला लागलेली कीड आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी त्यांची आमदारकी काढून घ्या आणि त्यांना पक्षातून काढून टाका, अशी आग्रही मागणी संतोष पाटील यांनी फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading