संशोधक मार्गदर्शकांची कार्यशाळा संपन्न
पुणे :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी पुणे शहरातील संलग्नित महाविद्यालये/ परिसंस्था मधील विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा आणि वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेमधील संशोधन मार्गदर्शकांसाठी दिनांक ०३ डिसेंबर, २०२४ रोजी एम.ई.एस. वरिष्ठ महाविद्यालय, कोथरुड, पुणे येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये पहिल्या सत्रात विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेमधील संशोधन मार्गदर्शकांना विद्यापीठाचे मा. प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर , विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे मा. अधिष्ठाता, प्रा. डॉ. प्रमोद पाटील, तज्ज्ञ मार्गदर्शक प्रा. डॉ. पंडित विद्यासागर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
तसेच दुसऱ्या सत्रामध्ये वाणिज्य व्यवस्थापन विद्याशाखेतील संशोधन मार्गदर्शकांना वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. (डॉ.) यशोधन मिठारे व तज्ज्ञ मार्गदर्शक प्रा. डॉ. शैलेश कासांडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सदरील कार्यशाळेस मा. व्यवस्थापन परिषद सदस्य श्रीमती भाग्यश्री मंठाळकर व प्रा. डॉ. नितीन घोरपडे उपस्थित होते.
