जागतिक दिव्यांग दिवसाच्या निमित्ताने एसबीआयतर्फे २९ पॅरालिम्पिक विजेत्यांचा गौरव
मुंबई : देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने जागतिक दिव्यांग दिवसाच्या निमित्ताने पॅरिस २०२४ पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेतील भारताच्या पॅरालिम्पिक विजेत्यांचा सन्मान करण्यासाठी सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमादरम्यान, बँकेने २९ पॅरालिम्पिक विजेत्यांना धनादेश प्रदान केले आणि त्यांच्या अद्वितीय कामगिरीचा गौरव केला. भारताने या पॅरालिम्पिकमध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करत १८ वा क्रमांक मिळवला.
कार्यक्रमात विचार मांडताना एसबीआय अध्यक्ष सी. एस. सेटी म्हणाले, “पॅरिस २०२४ पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेमधील भारताची कामगिरी हा आपल्या देशाच्या क्रीडा प्रवासातील एक निर्णायक क्षण ठरला. या खेळाडूंनी केवळ जिद्द आणि संयमाच्या जोरावर अशक्य ते शक्य करून दाखवले, अडथळे पार केले आणि देशाला प्रेरणा दिली. एसबीआयमध्ये आम्हाला या विजेत्यांना पाठिंबा देण्यात अभिमान वाटतो आणि आम्ही भारतीय क्रीडाविश्वासाठी अधिक समावेशक, प्रोत्साहन पूरक वातावरण निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहोत.”
सर्वसमावेशकतेच्या दिशेने आपल्या वचनबद्धतेला अनुसरून, एसबीआयने २०२४-२५ या आर्थिक वर्षातील आपल्या सीएसआर उपक्रमांचा भाग म्हणून आर्टिफिशियल लिम्ब्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एएलआयएमसीओ) सोबत सहयोग करण्याची घोषणा केली. या भागीदारीचा उद्देश देशभरातील २० ठिकाणी सुमारे ९००० दिव्यांगजनांना साहाय्यक उपकरणे वितरीत करणे आहे.
या उपक्रमातून व्यक्तिगत सक्षमीकरण, सर्वसमावेशकतेला चालना आणि भारतीय क्रीडा प्रकारांना पाठिंबा देण्यासाठी असलेली एसबीआयची बांधिलकी अधोरेखित होते.
पदक विजेते :
सुवर्णपदक: Harvinder Singh, Sumit Antil, Dharambir, Praveen Kumar, Navdeep Singh, Nitesh Kumar, Avani Lekhara
रौप्यपदक: Nishad Kumar, Yogesh Kanthuniya, Sharad Kumar, Ajeet Singh, Sachin Khilari, Pranav Soorma, Thulasimathi Murugesan, Suhas Yathiraj, Manish Narwal
कांस्यपदक: Sheetal Devi, Rakesh Kumar, Preethi Pal, Deepthi Jeevanji, Mariyappan Thangavelu, Sundar Singh Gurjar, Hokato Hotozhe Sema, Simran Sharma, Manisha Ramadass, Nithya Sre Sivan, Kapil Parmar, Mona Agarwal, Rubina Francis
