Monday, June 8, 2026
Latest NewsPUNE

भारतीय जैन संघटनेचे ‘राष्ट्रीय अधिवेशन’ पुणे येथे संपन्न होणार

 

पुणे : मागील चाळीस वर्षांपासून सामाजिक-कौटुंबिक समस्या, सामूहिक विवाह, महिला सक्षमीकरण, आपत्ती प्रतिसाद व व्यवस्थापन, जलस्त्रोत विकास, आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पुनर्वसन आदी क्षेत्रांत देशातील अग्रगण्य सामाजिक संस्था असलेल्या भारतीय जैन संघटनेचे (बीजेएस) ‘राष्ट्रीय अधिवेशन’ दि. ३० नोव्हेंबर व १ डिसेंबर २०२४ रोजी वर्धमान सांस्कृतिक भवन, बिबवेवाडी, पुणे येथे संपन्न होणार आहे. दर दोन वर्षांनी होणार्‍या या राष्ट्रीय अधिवेशनासाठी देशभरातील मान्यवर राजकीय नेते, प्रसिद्ध उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ आणि बीजेएसचे तीन हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
या अधिवेशनात उद्घाटन सत्राबरोबरच अनेक सत्र, थेट संवाद, सांस्कृतिक कार्यक्रम, शपथविधी असा भरगच्च दोन दिवसीय कार्यक्रम असणार आहेत. यात देशभरातून आलेले तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. बदलती जीवनशैली आणि काळानुसार जैन समाजाचे अनेक गुंतागुंतीचे निर्माण झाले आहेत. कालानुरूप प्रश्न बदलले आहेत, त्यांनी उग्र रूप धारण केले आहे. जैन समाजातील या कौटुंबिक, सामाजिक, वैवाहिक अशा अनेक प्रश्नांवर विचारमंथन आणि त्यावरील उपाय यावर सविस्तर चर्चा होणार आहे. तसेच नव्या पिढीला समजेल, अशा त्यांच्या भाषेत बीजेएसने तयार केलेल्या खास कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. त्याचबरोबर नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा शपथविधी, अनेक सहभागी राज्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमही संपन्न होणार आहे. विशेष म्हणजे संस्थेच्या कार्याची व्याप्ती देशभर पसरलेली असून संस्थेशी जोडले गेलेले अनेक राज्यात कार्यरत हजारो समर्पित कार्यकर्ते यात सहभागी होणार आहेत.
“बेंगलोर, चेन्नई, उदयपूर येथील राष्ट्रीय अधिवेशन यशस्वीपणे संपन्न झाल्यानंतर यावर्षी पुणे शहर या अधिवेशनासाठी सज्ज झाले आहे. मागील तीन-चार महिन्यांपासून या अधिवेशनाच्या तयारीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यात देशभरातील बीजेएसचे ३००० कार्यकर्ते, प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. मागील अधिवेशनांप्रमाणेच हे अधिवेशन ऐतिहासिक होईल, यात शंका नाही.” असा विश्वास भारतीय जैन संघटनेचे संस्थापक श्री. शांतिलाल मुथ्था यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading