Monday, June 8, 2026
Latest NewsPUNE

भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेच्या वतीने संविधान उद्देशिका वाचन व अभिवादन

 

पुणे : भारतीय संविधान दिनानिमित्त पुणे शहरातील मोतीबागेमध्ये संविधानास अभिवादन करण्यात आले. “राष्ट्र सर्वप्रथम!’ ही शिकवण आपले भारतीय संविधान देते. आपले संविधान हे ‘आम्ही भारतीय लोकांनी स्वतःप्रत अर्पण केलेले आहे, हे त्याचे वैशिष्ट्य आहे’, असे मत रा. स्व. संघाचे पुणे महानगर कार्यवाह  सचिन भोसले यांनी यावेळी मांडले. या प्रसंगी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
भारतीय संस्कृती संवर्धक संस्था, पुणे या संस्थेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संस्थेचे अध्यक्ष  राजीव जोशी, कार्यवाह  प्रसादराव खेडकर यांचेसह संस्थेचे विश्वस्त सर्वश्री प्रकाश आठवले, अप्पा मणेरे आणि राजेंद्र वालेकर, त्याचप्रमाणे संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. सुहासराव हिरेमठ,  श्रीधरपंत फडके, परिसरातील हमालवाडा आरोग्य कोठीचे मुकादम दत्तात्रय बडंबे यांचेसह सर्वश्री सुशील दळवी, प्रशांत शिरसाट, रामू धनगर, राहूल सोनवणे हे सेवक बंधू यावेळी आवर्जून उपस्थित होते. संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. किरण गांधी यांनी मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार व्यक्त केले. अल्पोपहार व चहापानाने हा कार्यक्रम संपन्न झाला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading