Monday, June 8, 2026
BusinessLatest News

पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंडातर्फे पीजीआयएम इंडिया हेल्थकेअर फंड योजना

मुंबई : पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंडाने आरोग्यसेवा आणि फार्मा कंपन्यांचे समभाग आणि समभागाशी संबंधित साधनांमध्ये गुंतवणूक करणारी पीजीआयएम इंडिया हेल्थकेअर फंड ही मुदतमूक्त श्रेणीतील समभाग गुंतवणूक योजना सुरू करत असल्याची घोषणा आज केली आहे. या  फंडासाठी बीएसई हेल्थकेअर हा आधारभूत निर्देशांक राहणार आहे.

नवीन फंड गुंतवणूकीसाठी येत्या १९ नोव्हेंबर २०२४ ला खुली होत असून ३ डिसेंबर २०२४ ला बंद होणार आहे. त्यानंतर फेरगुंतवणूक आणि फेरखरेदीसाठी ही योजना पुन्हा ११ डिसेंबर २०२४ पासून खुली होणार आहे.

नवीन फंडाबद्दल टिप्पणी करताना पीजीआयएम इंडिया अँसेट मॅनेजमेंटचे सीईओ अजित मेनन म्हणाले, “पीजीआयएम इंडिया हेल्थकेअर फंड गुंतवणूकदारांना भारताच्या वाढत्या आरोग्य सेवा क्षेत्राचा लाभ घेण्यासाठी आकर्षक संधी देत आहे. कमी खर्चनाविन्यआरोग्य विम्यासाठी वाढती जागरूकतावाढता एफडीआय प्रवाह आणि वाढत चाललेले वैद्यकीय पर्यटन आणि अन्य काही घटकांचा भारतीय आरोग्य सेवा क्षेत्राला फायदा होत आहे. आमची ठाम धारणा आहे की, एखाद्या व्यक्तीने स्वत:च्या आरोग्यासाठी केलेली गुंतवणूक ही सर्वोत्तम गुंतवणूक आहे. त्यापुढील सर्वोत्कृष्ट गुंतवणूक म्हणजे स्वतःचे आणि तुमच्या कुटुंबाचे आरोग्य/जीवन विम्याद्वारे संरक्षण करणे आणि आरोग्यसेवेत (हेल्थकेअर) एक क्षेत्र म्हणून गुंतवणूक करणे जी एक संरचनात्मक संकल्पना आहे.”

नवीन फंडाच्या संकल्पनेबद्दल बोलताना पीजीआयएम इंडिया अँसेट मॅनेजमेंटचे सीआयओ विनय पहारिया म्हणाले, आम्हाला आशा आहे की आरोग्य देखभाल क्षेत्र भारताच्या विकास कथेचा संरचनात्मक लाभार्थी असेल. स्थिर आणि वाढती देशांतर्गत मागणीकिमतीची सक्षम शक्तीभारताच्या स्पर्धात्मक फायद्यामुळे उत्तम निर्यातीची क्षमता आणि जागतिक फार्मा कंपन्याव्दारे अवलंबलेली चीन प्लस वन रणनीती यासारख्या अनेक सहांय्यकारी घटकांची जोड या क्षेत्राला मिळण्याची शक्यता आहे.

या योजनेतील किमान ८० टक्के निधी हा फार्मा आणि हेल्थकेअर या क्षेत्रातील कंपन्यांत गुंतविला जाणार आहे. तर २० टक्क्यांपर्यंतचा निधी अन्य समभाग, रोखे आणि चलन बाजार (२० टक्क्यांपर्यंत), रिटस् आणि इनव्हीट (१० टक्क्यांपर्यंत) तसेच विदेशातील इटीएफसह विदेशातील रोख्यात २० टक्क्यांपर्यंत गुंतविला जाणार आहे.  

पीजीआयएमचा हा फंड आरोग्य सेवा आणि आरोग्य सेवा उत्पादनासह आरोग्य सेवा देखभाल उद्योगातील विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकतो. आरोग्य सेवांमध्ये फार्मसीनिदानरुग्णालये आणि आरोग्य विमा यांचा समावेश होतो. आरोग्यसेवा देखभाल उत्पादनात क्रॅम्स (कॉन्ट्रॅक्ट रिसर्च आणि मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस)वैद्यकीय उपकरणेविशेष रसायनेफॉर्म्युलेशन आणि एपीआय (सक्रिय फार्मास्युटिकल घटक) आदींचा समावेश होतो.

पीजीआयएम इंडिया अँसेट मॅनेजमेंटच्या इक्विटी विभागाचे वरिष्ठ फंड व्यवस्थापक आनंदा पद्मनाभम अंजेनियान म्हणाले, “हेल्थकेअर क्षेत्राला तुलनेने कमी लवचिक मागणी असते. त्याचा परिणाम उच्च किंमत शक्तीमध्ये होतो. विशेषत: महागाईच्या काळात हा परिणाम दिसून येतो. ही बाब गुंतवणूकदाराला दीर्घ कालावधीत चक्रवाढ भांडवलाची संधी देते.”

या फंडात तळ ते शिखर आणि शिखर ते तळ यांच्या संयुक्त मिश्रणातून पोर्टफोलिओची उभारणी केली जाणार आहे. यात समभागांच्या मूलभूत घटकांवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. त्यात कंपनीच्या व्यवस्थापनाची गुणवत्ता हा महत्वाचा घटक राहणार आहे.

योजनेतील इक्विटीतील गुंतवणूकीची जबाबदारी आनंदा पद्मनाभन अंजेनेयनविवेक शर्मा आणि उत्सव मेहता हे सांभाळणार आहेत, तर रोखे गुंतवणूकीचे व्यवस्थापन पुनीत पाल करणार आहेत.  

हेल्थकेअर सदाबहार थीम कशामुळे बनवते?

  • थेट विदेशी गुंतवणूकीचा वाढता प्रवाह आणि सरकारी खर्चाचा फायदा मिळवण्यासाठी बहुदशकीय संरचनात्मक गुंतवणूक संकल्पना.
  • 2025 पर्यंत देशाच्या जीडीपीच्या 2.5% पर्यंत पोहोचण्याचा अंदाज असलेल्या वाढीव सरकारी खर्चाचा फायदा. (स्रोत: www.ibef.org)
  • वाढत्या वयोवृद्ध लोकसंख्येमुळे वैद्यकीय सेवांच्या वाढत्या मागणीचा फायदाअधिक आरोग्य जागरूकता आणि सरकारी खर्चात वाढ.
  • एआय आधारित डायग्नोस्टिक्समेड-टेकटेलिमेडिसिनप्रतिबंधात्मक आरोग्यसेवावैद्यकीय पर्यटन आणि अन्य घटक यासारखे उदयोन्मुख प्रवाह या क्षेत्रासाठी फायदेशीर आहेत.
  • आर्थिक मंदीपासून तुलनेने सुरक्षित असलेल्या या संकल्पनेत सहभागी होण्याची संधी.
  • आरोग्यसेवा आणि सहाय्यक क्षेत्रात विविधांगी गुंतवणुकीची संधी.
  • वाढत्या उत्पन्नाचा स्तर आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेकडे बदलत जाणारा दृष्टीकोन याचा लाभ घेण्याची संधी.

 

प्रमुख वैशिष्ट्ये 

अर्जाची किमान रक्कम

  • प्रारंभिक खरेदी/स्विच-इन: किमान 5,000 रुपये आणि त्यानंतर 1 रुपयांच्या पटीत.
  • अतिरिक्त खरेदी: किमान 1,000 रुपये आणि त्यानंतर एक रुपयांच्या पटीत.
  • विमोचन: 1,000 रुपये आणि एक रुपयांच्या पटीत किंवा खाते शिल्लक यापैकी जे कमी असेल.
  • एसआयपीः किमान पाच हप्ते आणि प्रति हप्ता किमान रक्कम एक हजार रुपये प्रत्येकी आणि त्यानंतर एक रुपयांच्या पटीत

शुल्क आकारणी (एक्झिट लोड)

एकरकमी/स्विच-इन/नियमित गुंतवणूक योजना (एसआयपीआणि नियमित निधी हस्तांतरण योजना (एसटीपीद्वारे युनिट्सच्या प्रत्येक खरेदीसाठी:

  • युनिट वाटप झाल्यापासून ९० दिवसांच्या आत : ०.५०%.
  • युनिट्सच्या वाटपाच्या तारखेपासून ९० दिवसांच्या पुढे : शून्य

संपूर्ण एक्झिट लोड (वस्तू आणि सेवा कराचे निव्वळ) आकारले गेले असल्यासयोजनेत जमा केले जाईल.

म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असतेसर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading