Monday, June 8, 2026
ENTERTAINMENTLatest News

अमोल अप्पी आणि अर्जुनचे भावनिक क्षण !

अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत अमोलची कॅन्सरशी झुंज सुरु आहे. अमोलचा आजार 3rd स्टेजल पोचलेला आहे,  त्यामुळे घरी सगळ्यांना टेंशन आहे. अमोल म्हणतो तुम्ही रडलात तर मी लवकर जाईन,  इथून पुढे प्रत्येक दिवस मी एका वर्षसारखा जगणार आहे. अमोल इतक्या भयानक आजाराशी सामना करतोय हे बघताना प्रत्येक दिवस अप्पी आणि अर्जुनसाठी कठीण जात आहे. अमोलच्या सांगण्यावरून सगळ्यांनी दिवाळी एकत्रित साजरी केली. घरी कोणालाच कामावर जायची इच्छा नाहीये, पण अमोल एकेकाला छडी घेऊन हाकलतो, कामाच्या ठिकाणी कुणाचच मन लागत नाहीये. दिवसा अप्पी तर अर्जुन नाईट ड्यूटी घेतो. अमोलला घरच्या सगळ्यांचे दुःख कळतंय तेव्हा तो ठरवतो की जाण्याआधी मी सगळ्यांचे आयुष्य सुखी करून जाणार !

आता केमोथेरपीचा सामना करत असताना अमोलची त्याच्या आजाराशी लढाई अधिक तीव्र होत जाणार आहे. परंतु तो प्रत्येक दिवस पूर्णपणे जगण्याचा दृढनिश्चय करतोय. केमोथेरपीमुळे अमोलचे केस काढले जातात त्यामुळे घरच्या सगळ्यांना वाईट वाटतंय, घरचे सगळेच पुरुष त्याच्यासोबत केस काढायला बसतात पण अमोल त्यांना थांबवतो.

कॅन्सर वॉर्डमध्ये असलेली लहान मुले आणि त्यांच्या पालकांना दुःखी बघून अमोलल वाईट वाटतं, आणि तो काहीतरी शक्कल लढवून तिथले वातावरण बदलतो, सगळ्यांना खुश करतो.

अमोलला heavy औषधांमुळे त्रास होतोय, पण त्यातून त्याला बाहेर काढतात ते अप्पी व अर्जुन ! दोघांनाही दिवसा व रात्री ड्यूटी असल्यामुळे त्यांना एकत्र एकच तास मिळतो, तो ते अमोलसोबत घालवतात. या कठीण परिस्थितीत अमोलच मनोबल वाढवायला अप्पी, अर्जुन आणि संपूर्ण कुटुंब त्याच्या सोबत आहे. अचानक अमोलची प्रकृती बिघडल्याने तणाव वाढतो. तर दुसरीकडे संकल्पचा छुपा धोका सर्वांवर आहे.

हा भावनिक क्षण बघायला विसरू नका ‘अप्पी आमची कलेक्टर’ सोम- शनी संध्या ६:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading