Thursday, June 18, 2026
BusinessLatest News

महाराष्ट्राचा कौल विकासालाच.. मसालाकिंग डॉ धनंजय दातार

 

महाराष्ट्र विधानसभा २०२४ निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीला २०० हून अधिक जागा देत निर्विवाद बहुमत दिले आहे. हा निकाल महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीसाठी हितकारी आणि उत्साहवर्धक ठरेल, असे एक उद्योजक या नात्याने वाटते. कारण कोणत्याही राज्याची आर्थिक-औद्योगिक प्रगती ही शासकीय धोरणांच्या स्थिरतेवर अवलंबून असते आणि धोरणे स्थिर राहण्यासाठी तेथील राजवट मजबूत असावी लागते. अशा शब्दांत अदील ग्रुप ऑफ सुपर स्टोअर्स, दुबई, युएई चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ धनंजय दातार यांनी नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या. पुढे ते म्हणाले, केंद्रात व महाराष्ट्रात पुढील पाच वर्षे एकाच आघाडीचे, एकविचाराने चालणारे आणि विकासाभिमुख सरकार काम करणार असल्याने आगामी काळात अस्थिर सरकार, तडजोडीचे सरकार किंवा राष्ट्रपती राजवट अशा आव्हानांचा मुकाबला करावा लागणार नाही आणि विकासासाठी केंद्रीय निधीचीही कमतरता भासणार नाही, हे खूप आश्वासक आहे.

महायुतीच्या गेल्या शासनकाळात राज्यकर्त्यांच्या दूरदृष्टी मुळे महाराष्ट्रात प्रगतीची व्यापक आणि वेगवान पावले पडलेली दिसली आहेत. त्याच दमदार वाटचालीचा पुढचा टप्पा भविष्यकाळातही कायम राहील. पायाभूत सुविधा विकासाचे अनेक प्रकल्प पूर्ततेच्या टप्प्यात आहेत. त्यातील काही महाराष्ट्राइतकेच देशाच्या भरभराटीसाठीही महत्त्वाचे आहेत. समृद्धी महामार्ग, मेट्रो, बुलेट ट्रेन, नवे रस्ते व रेलमार्ग बांधणी तथा विद्यमान मार्गांचा विस्तार, वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, प्रस्तावित वाढवण बंदर ही त्यापैकी काही उदाहरणे. महाराष्ट्रात गुंतवणूक, वाहतूक, आयात-निर्यात, औद्योगिक विकास यांना पुढील पाच वर्षांत जोरदार चालना मिळेल, ज्याचा परिणाम राज्याची आर्थिक भरभराट होण्यावर होईल. नव्या सरकारला आणि नेतृत्वाला अनेक शुभेच्छा.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading