Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

जाधवर इन्स्टिट्यूटमध्ये मानवी साखळीतून हृदयाचे महत्व

पुणे : जागतिक ह्रदय दिनाच्या निमित्ताने मानवी शरीरातील ह्रदयाचे महत्व विद्यार्थीनींना समजावे, या उद्देशाने न-हे येथील उद्धवराव तुळशीराम जाधवर फाउंडेशनच्या इन्स्टिट्यूट आॅफ नर्सिंग च्या विद्याथीर्नींनी मानवी साखळीतून ह्रदय साकारले. ह्रदयाचे कार्य कशा प्रकारे होते, त्याची काळजी कशा प्रकारे घ्यायला हवी, याविषयी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील करण्यात आले.

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर यांसह नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य शितल निकम व सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते.

अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, जागतिक आकडेवारीनुसार हृदयविकार हे मृत्यूचे प्रमुख कारण आहे. अधिकतर व्यक्ती हृद् रोहिणी विकार किंवा हृदयविकाराचा झटका आल्याने मरण पावतात. असंतुलित आहार, व्यायामाची कमतरता, धूम्रपान, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलता, हवाप्रदूषण ही हृदयविकाराची महत्त्वाची कारणे आहेत. हृदयविकारासंबंधित माहिती तसेच प्रतिबंधात्मक उपाय यांबद्दल चर्चा, फलक किंवा माहिती पत्रिका यांद्वारे यानिमित्ताने जनजागृती केली जाते. संतुलित आहार, व्यायाम यांद्वारे हृदयविकाराला प्रतिबंध होऊ शकतो, याबाबत माहिती दिली जाते. ती माहिती मानवी साखळीतून संस्थेत देण्यात आली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading