Sunday, June 14, 2026
ENTERTAINMENTLatest News

बिग बॉस मराठी’च्या घरात आज येणार ‘नवरा माझा नवसाचा 2’ची टीम; आवडत्या कलाकारांसह सदस्य खेळणार मजेदार टास्क

Bigg Boss Marathi Day 57 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांसाठी चाहते नवस करताना दिसत आहेत. आज या घरातील सदस्यांना खास सरप्राईज मिळणार आहे. ‘बिग बॉस मराठी’सह सध्या नुकताच प्रदर्शित झालेला ‘नवरा माझा नवसाचा 2’ हा सिनेमाही चर्चेत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी कलाकार मंडळी आज बिग बॉस मराठीच्या घरात येणार आहेत.

प्रोमोमध्ये, बिग बॉस म्हणत आहेत,”‘नवरा माझा नवसाचा 2’ या सिनेमातील कलाकार यांचं बिग बॉसच्या घरात स्वागत करत आहे. स्वप्नील जोशी, सुप्रिया पिळगांवकर आणि अशोक सराफ बिग बॉसच्या घरात एन्टी करणार आहेत. हे कलाकार डम डम डमरू बाजे या गाण्यासह अनेक गाण्यांवर धमाल डान्स करण्यासह सदस्यांना पदार्थ ओळखण्याचा मजेदार टास्क देणार आहेत.

‘नवरा माझा नवसाचा 2’ हा चित्रपट 19 वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला चांगले यश मिळत आहे. ‘नवरा माझा नवसाचा 2’ चित्रपटाच्या टीमला ‘बिग बॉस मराठी’च्या घरात पाहताना प्रेक्षकदेखील आनंदी होणार आहेत. तसेच या टीमला पाहून सदस्यांनादेखील चांगलाच आनंद झालेला पाहायला मिळेल.

‘BIGG BOSS मराठी’, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर

ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading