Sunday, June 7, 2026
BusinessLatest News

फ्लिपकार्ट ‘द बिग बिलियन डेज’च्या ११व्या आवृत्तीसाठी सज्ज

नवीन तंत्रज्ञान लाँचेस, सप्लाय चेनमध्ये १ लाखांहून अधिक नवीन नोकऱ्या, जलद वितरण आणि लाखो विक्रेत्यांसाठी प्रगतीची संधी

सर्वांना प्रगतीची संधी देणारा शॉपिंग फेस्टिव्हल

● द बिग बिलियन डेज २०२४ हा उपक्रम २७ सप्टेंबर २०२४ पासून सर्व खरेदीदारांसाठी लाइव्ह होणार आहे.

● व्हीआयपी आणि फ्लिपकार्ट प्लस ग्राहकांना २४ तास आधीपासूनच २६ सप्टेंबरपासूनच या महोत्सावाचा लाभ घेता येईल.
● सणासुदीच्या मोममाचा फ्लिपकार्ट मार्केटप्लेस विक्रेत्यांना लाभ घेण्यासाठी १५ सप्टेंबर ला ‘बिग सेल ऑफ स्मॉल थिंग्स’ हा महोत्सव सुरू झाला.
● TBBD च्या ११व्या आवृत्तीच्या आधी, १४ लाख उद्योजक आणि विक्रेत्यांना संधी मिळवून देण्याचा एक भाग म्हणून संपूर्ण भारतात आयोजित केलेल्या विक्रेते संमेलनात ४५०० विक्रेत्यांनी सहभाग घेतला.
● फ्लिपकार्ट समर्थने देखील ५ वर्षांच्या प्रवासाचा टप्पा साजरा केला. त्यामुळे १८ लाख लोकांचे जीवनमान सुधारले आहे.१०० पेक्षा कला प्रकारांचं संवर्धन करण्यात आलं असून हजारो विक्रेत्यांच्या प्रगतीसाठी प्रोत्साहन दिलं आहे.

● सणासुदीच्या हंगामाच्या आधी, फ्लिपकार्टने देशभरात ११ नवीन फुलफिलमेंट सेंटर लाँच करून त्यांच्या भारतभरातील सप्लाय चेन नेटवर्कला आणखी बळकटी दिली आहे. या सेंटर्सचं एकूण क्षेत्रफळ १३ लाख चौरस फूट आहे.
● फ्लिपकार्ट २०२४च्या बिग बिलियन डेज या उपक्रमात २० पेक्षा अधिक शहरांमध्ये २ लाखांहून अधिक स्टॉक किपींग युनिटसह (उत्पादने) त्याच दिवशी वितरण करण्यासाठी सज्ज आहे.
● यामुळे फ्लिपकार्टमध्ये संपूर्ण भारतात सप्लाय चेन नेटवर्कमध्ये १ लाख नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. यातून सामाजिक-आर्थिक विकासासाठी फ्लिपकार्टची वचनबद्धता दिसून येते.
● मोठ्या शहरांसह छोट्या शहरांमध्येही विश्वासार्ह आणि तातडीने वितरणावर अधिक लक्ष केंद्रित करून फ्लिपकार्टने त्यांची लॉजिस्टिक क्षमता वाढवली आहे.

● द बिग बिलियन डेज २०२४ मध्ये विक्रेत्यांनी स्मार्टफोन्स, घरातली उपकरणें, लॅपटॉप्स इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, ब्युटी, गृहसजावट इत्यादी श्रेणीतील उत्पादनांवर आकर्षक डील्स दिल्या आहेत.
● ‘ओपन बॉक्स डिलिव्हरी’ अंतर्गत, टेलिव्हिजन, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह आणि मोबाईल यांसारख्या उच्च-मूल्य श्रेणीतील उत्पादनांवर सुरक्षित खरेदीचा अनुभव ग्राहकांना मिळेल
● फ्लिपकार्ट Flippi २.० आणि इमर्सिव्ह शॉपिंगसह सर्वोत्तम तंत्रज्ञान आणत आहे. त्यामुळे या काळात शॉपिंगचा अनुभव आणखी सुटसुटीत होईल.
● एचडीएफसी बँकेबरोबर भागीदारी करून फ्लिपकार्ट ग्राहकांना डेबिट कार्ड्स, क्रेडिट कार्ड्स आणि इएमआय इत्यादी व्यवहारांवर १० टक्के सूट देईल.
● फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड ५ टक्के अमर्यादित कॅशबॅक देईल आणि ग्राहक फ्लिपकार्ट पे लेटरचा वापर करून त्वरित क्रेडिट आणि नो-कॉस्ट इएमआय* सारख्या सुविधांचा वापर करू शकतात (*अटी आणि नियम लागू)
● फ्लिपकार्ट यूपीआय वापरणाऱ्या ग्राहकांसाठी रोज कॅशबॅक मिळेल
● फ्लिपकार्टच्या समूहातील शॉपसी, फ्लिपकार्ट होलसेल आणि क्लिअरट्रिप या कंपन्यांच्या उत्पादनं आणि सेवांवर अनेक डील्स आणि ऑफर्स उपलब्ध असतील

● क्लियरट्रिपवर, ग्राहक २४९९ रुपयांपासून सुरू होणाऱ्या विशेष दरांमध्ये पंचतारांकित हॉटेल्स बुक करू शकतात. हवाई प्रवासासाठी, क्लियरट्रिपने ५० हवाई कंपन्यांनी भागीदारी केली आहे. आंतरराष्ट्रीय ठिकाणासाठी ५९९९ रुपयांपासून आणि देशांतर्गत प्रवासासाठी ९९९ रुपयांपासून प्रवासभाडे असेल.
● फ्लिपकार्ट होलसेल त्याच्या किराणा सदस्यांसाठी अनोखी ऑफर्स आणणार आहे. त्यामुळे त्यांची कार्यक्षमता आणि मूल्य प्रस्ताव वाढेल.

बंगळुरू : फ्लिपकार्टने ‘द बिग बिलियन डेज’ (TBBD)२०२४ या त्यांच्या बहुप्रतिक्षित महोत्सावाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. हा खरेदी महोत्सव २७ सप्टेंबरपासून सुरू होईल आणि ६ ऑक्टोबर २०२४ पर्यंत चालेल. तर फ्लिपकार्ट प्लस आणि VIP सदस्यांसाठी २६ सप्टेंबरपासून हा महोत्सव सुरू होईल. देश सणवाराच्या मोसमासाठी सज्ज होत असताना, ‘द बिग बिलियन डेज’ २०२४ मुळे सर्वोत्तम डील्स आणि उत्पादनांची आकर्षक वर्गवारी यामुळे उत्साहाचं वातावरण निर्माण होणार आहे. वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी आणि सणासुदीच्या तयारीचा एक भाग म्हणून, फ्लिपकार्टने TBBD च्या आधी ९ शहरांमध्ये ११ नवीन फुलफिलमेंट सेंटर्स (FCs) सुरू केली आहेत. त्यामुळे भारतातील एकूण फुलफिलमेंट सेंटर्सची संख्या ८३ झाली आहे. या सर्व घडामोडींमुळे भारतभरात १ लाखांहून अधिक नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. त्यातून फ्लिपकार्टच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी वचनबद्धता दिसून येते. कारण ते रोजगाराच्या संधी सक्षम करण्यावर भर देत आहे.

फ्लिपकार्ट सणासुदीच्या हंगामात ऑनलाइन खरेदी करण्याच्या पद्धतींमध्ये क्रांती घडवत, ई-कॉमर्समध्ये नवीन मानकं प्रस्थापित करत आहे. त्याचप्रमाणे भागधारकांसाठी प्रगतीच्या संधी निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे.

‘द बिग बिलियन डेज’ च्या ११व्या आवृत्तीबद्दल बोलताना फ्लिपकार्ट ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याण कृष्णमूर्ती म्हणाले, “द बिग बिलियन डेज हा फ्लिपकार्टसाठी केवळ खरेदीचा उत्सव नाही – तर हे डिजिटल कॉमर्स च्या माध्यमातून विक्रेते,लघू आणि मध्यम उद्योग, डीटूसी ब्रँड्स आणि आंतरराष्ट्रीय लेबल्स या संपूर्ण व्यवस्थेचा विकास करू शकतं याचं द्योतक आहे. भारतात सणासुदीचा मोसम सुरू होत असताना, आम्ही संपूर्ण देशासाठी मूल्यांमध्ये भर घालण्यास कटिबद्ध आहोत. या माध्यमातून ग्राहकांना परवडणारी उत्पादनं उपलब्ध होतात आणि विक्रेते तसेच स्थानिक उत्पादक जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतात. यावर्षी ‘द बिग बिलियन डेज’मुळे इ-कॉमर्स क्षेत्रातील परिभाषा नव्याने विकसित होतील. सर्वसमावेशकता, नावीन्यपूर्ण उपक्रम आणि शाश्वत विकासाला चालना मिळेल. भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेच्या भविष्यात आमची महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत.”

भविष्यातील खरेदीचे अनुभव नावीन्यपू्र्ण तंत्रज्ञानामुळे आणखी सुलभ

● व्हीडिओ कॉमर्स: अनेक नवे व्हीडिओ कॉमर्स इंटरअ‍ॅक्शन TBBD च्या आसपास लाइव्ह होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सणासुदीचा मोसम आणखी खास आणि आकर्षक होईल. यावर्षी विविध ब्रँड्स आणि विक्रेते लाइव्ह कॉमर्सद्वारे सर्वोत्तम ऑफर देणार आहेत.

● Flippi 2.0: हे जनरेटिव्ह AI असलेलं चॅट असिस्टंट आहे. त्यामुळे ग्राहकांना खरेदीसंबंधी कोणत्याही प्रश्नांचे सोप्या संभाषणाद्वारे उत्तर मिळविण्यास मदत करते. “माझ्यासाठी योग्य उत्पादन कोणतं?”, “या गॅझेटचे परफॉर्मन्स रिव्ह्यू काय आहेत?” आणि “माझ्या बजेटसाठी सर्वोत्तम डील काय आहे?” या लोकप्रिय प्रश्नांचा त्यात समावेश आहे.

● इमर्सिव्ह शॉपिंग: युजर्सना उत्पादनाची माहिती योग्य पद्धतीने समजण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करतं

जनरेटिव्ह AI युक्त उत्पादनाची माहिती देणारा 3D व्हीडिओ – 3D व्हिज्युअलायझेशनसह उत्पादनाचे आणि त्याच्या वैशिष्ट्यांचे व्हॉइसओव्हर असलेले व्हीडिओ.

-खरेदीपूर्वी घड्याळ वापरून पाहा – या फीचरमुळे युजर्सना त्यांच्या मनगटावर घड्याळं आभासी पद्धतीने वापरता येईल. यामुळे खरेदी करताना आत्मविश्वास वाटेल.

● गेमिफाइड एंगेजमेंट आणि रिवॉर्ड वितरण (फायर ड्रॉप्स -फ्लिपकार्टच्या ब्रँड-फर्स्ट एंगेजमेंट आणि लॉयल्टी प्लॅटफॉर्म च्या सहाय्याने)

फ्लिपकार्ट यूपीआय ची गेमिफिकेशनच्या माध्यमातून स्वीकार्हतेत वाढ – हे फायरड्रॉप्सच्या माध्यमातून विकसित केलेलं गेमिफिकेशन मॉडेल आहे. या मॉडेलद्वारे ग्राहक फ्लिपकार्ट यूपीआय संबंधित सोपे टास्क पूर्ण करून सुपरकॉइन्स मिळवू शकतात.
स्टुडंट्स पास – विद्यार्थ्यांच्या व्हेरिफाइड प्रोफाइल्सना खास सुपरकॉइन्स ऑफर आणि रिवॉर्ड्सचा लाभ घेता येईल.

विक्रेत्यांच्या नेटवर्कचा विस्तार करून सर्व ग्राहकांसाठी सुलभता वाढवण्याचं उद्दिष्ट

● TBBD मध्ये २०% अधिक विक्रेते रिवॉर्ड्स आणि नवीन ग्राहक योजना यामुळे विक्रेत्यांना सणासुदीच्या मोसमात व्यापाराची वाढ करण्यास मदत होईल.

● सर्वोत्तम किंमतीत वस्तू उपलब्ध करण्यावर लक्ष केंद्रित करत, सणासुदीच्या खरेदी हंगामाची सुरुवात १५ सप्टेंबरला फ्लिपकार्ट मार्केटप्लेस विक्रेत्यांसाठी ‘’बिग सेल ऑफ स्माल थिंग्स’ने झाली. त्यामुळे विक्रेत्यांना या हंगामातील प्रगतीच्या संधींचा लाभ घेता येईल.

● TBBD च्या ११व्या आवृत्तीपूर्वी, फ्लिपकार्टच्या पॅन इंडिया उपक्रमाचा एक भाग म्हणून ४५०० विक्रेत्यांनी भारतभर आयोजित विक्रेते संमेलनांमध्ये सहभाग घेतला, १४ लाख उद्योजक आणि विक्रेत्यांसाठी संधीत वाढ करणे हा त्याचा उद्देश होता.

● TBBD पूर्वी, फ्लिपकार्ट समर्थने ५ वर्षांच्या प्रवासाचा महत्त्वपूर्ण टप्पा साजरा केला, ज्यात १८ लाख लोकांचं जीवनमान सुधारले, १०० हून अधिक पारंपारिक कला प्रकारांचं संवर्धन झालं आणि हजारो विक्रेत्यांच्या प्रगतीला चालना मिळाली.

विविध प्रवर्गात लवकरात लवकर डिलिव्हरची सोय

● फ्लिपकार्टने द बिग बिलियन डेज २०२४ पूर्वी २० पेक्षा अधिक शहरांमध्ये २ लाखांहून अधिक स्टॉक किपिंग युनिटसह एकाच दिवशी वितरणाची मागणी पूर्ण करण्यासाठी तयारी केली आहे.

● वितरणात विश्वासार्हता आणि सुरक्षितता: महानगर आणि इतर शहरांमध्ये जलद आणि अधिक विश्वसनीय वितरणावर अधिक लक्ष केंद्रित केल्यामुळे, फ्लिपकार्टने आपल्या लॉजिस्टिकल क्षमतांमध्ये सुधारणा केली आहे.

● यावर्षी ग्राहकांना विश्वसनीय उत्पादने पोहोचवण्यासाठी वितरणाचा दर्जा अधिक वाढवला जाणार आहे.

योग्य मूल्य आणि परवडणाऱ्या किंमतीमुळे ग्राहकांचा अनुभव चांगला करणं

● फ्लिपकार्टने एचडीएफसी बँकेबरोबर भागीदारी केली आहे. त्यामुळे ग्राहकांना सर्व डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि इएमआय व्यवहारांवर १० टक्क्यांची सूट मिळेल.

● फ्लिपकार्ट अक्सिस क्रेडिट कार्डवर ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळेल आणि ग्राहकांना फ्लिपकार्ट पे लेटरद्वारे त्वरित क्रेडिट आणि नो-कॉस्ट इएमआय* चा लाभ घेता येईल. (*अटी लागू)

● फ्लिपकार्ट यूपीआय वापरणाऱ्या ग्राहकांसाठी खात्रीशीर रोजचा कॅशबॅक दिला जाईल.

इकोसिस्टमचे फायदे अनलॉक करताना मिळतील रिवॉर्ड्स आणि ऑफर्स

● फ्लिपकार्ट प्लस आणि व्हीआयपी प्रोग्रामच्या सदस्यांना या महोत्सवासाठी एक दिवस आधी प्रवेश मिळेल. या विशेष सुविधेमुळे सदस्यांना सामान्य लोकांपेक्षा २४ तास आधी त्यांची आवडती उत्पादनं घेता येतील आणि ऑफर्सचा लाभ घेता येईल.

● एक दिवस आधी प्रवेश मिळाल्यावर, दर मिनिटाला खरेदी पूर्ण करणाऱ्या पहिल्या प्लस किंवा व्हीआयपी सदस्याला त्यांच्या कार्टची पूर्ण किंमत(जास्तीत जास्त १० हजार रुपयापर्यंत) परत दिली जाईल. यामुळे खरेदीचा उत्साह वाढेल आणि अतिरिक्त बचत होईल. (*अटी लागू)
● व्हीआयपी सदस्यांना टॉप ब्रँड्सकडून विशेष डील्स मिळतील आणि सुपर कॉइन्स वापरून अतिरिक्त १००० रुपयापर्यंतच्या डील्सचा लाभ घेऊ शकतील.

प्रत्येक ग्राहकासाठी सर्वोत्तम उत्पादनांची निवड

● ग्राहकांना प्रीमियम घरगुती उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स, आंतरराष्ट्रीय फॅशन आणि ब्यूटी ब्रँड्सवर सर्वोत्तम डील्स मिळण्याची अपेक्षा आहे.

● ‘ब्रँड मॉल’ चा अनुभव नवीन रुपात सादर केला जाईल. त्यामध्ये सर्व ब्रँडप्रेमी ग्राहकांसाठी राष्ट्रीय आणि नवीन ब्रँड्सची निवडक श्रेणी असेल.

● व्हॅल्यू शॉपर्ससाठी फॅशन, इलेक्ट्रॉनिक्स, घरगुती आवश्यक वस्तू, सजावट, ग्रूमिंग, पुस्तके आणि बेबी प्रॉडक्ट्स यामध्ये किफायतशीर पर्याय उपलब्ध असतील.

● फ्लिपकार्ट होलसेल त्यांच्या किराणा सदस्यांसाठी अनोख्या ऑफर्स आणेल तसेच त्याचे ऑपरेशन्स आणि व्हॅल्यू प्रपोजिशन बळकट करेल.

यावर्षी प्रवास आणखी सोपा होईल.

● सणावाराच्या दिवसात प्रवास महाग होता. मात्र क्लिअरट्रीपच्या डील्समुळे ग्राहकांच्या पैशाची बचत होईल. ग्राहक पंचतारांकित हॉटेल्स विशेष निवडक किंमतीवर बुक करू शकतात. ही किंमत २४९९ रुपयांपासून सुरू होईल. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठीचे भाडे ५९९९ रुपयांपासून तर देशांतर्गत प्रवासाचे दर ९९९ रुपयांपासून आहेत.

● फ्लिपकार्ट आणि मिंत्राचे युजर्स १५ टक्क्यांपर्यंत पर्यंत हॉटेल डील्सवर अतिरिक्त बचत करू शकतात. एक रुपयात फ्लाइट रद्द करू शकतात, तसंच सुपर कॉइन्स वापरून ऑफर रिडीम करू शकतात.

शॉप्सी बझारमध्येही सर्वांचा फायदा
● शॉप्सीध्ये भारतातील स्थानिक बाजारपेठेचा उत्तम अनुभव मिळेल. त्यामुळे ग्राहकांना १६ कोटी उत्पादनं उत्तम डील्ससह खरेदी करण्याची संधी मिळेल.
● ग्राहकांना फॅशन, ब्युटी, होम, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर विविध श्रेणींमध्ये बचत करू शकतील. तसंच पहिल्यांदाच खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी विशेष बचतीचे ऑफर्स असतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading