नेटफ्लिक्सवर ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ सीझन 2 परत येतोय
पुणे : “पाच वाजता नाही, सहा वाजता नाही, सात वाजता नाही, आठ वाजता ड्युटी सुरू होते.” जर तुम्हाला हे गाणं आवडत असेल, तर यापेक्षा आणखी बरेच काही तुम्हाला पाहायला मिळणार आहे! कपिल शर्मा, सुनील ग्रोव्हर, कृष्णा अभिषेक, किकू शारदा, राजीव ठाकूर आणि अर्चना पूरन सिंह आपल्या हास्याचा धमाका घेऊन परतले आहेत. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या पहिल्या यशस्वी सीझननंतर ते दुसऱ्या सीझनमध्ये आपल्या खास विनोदाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणार आहेत. नेटफ्लिक्सने आज दुसऱ्या सीझनचा ट्रेलर रिलीज केला आणि सर्वांना ‘शनिवार’ आता ‘फनीवार’मध्ये बदलण्याची उत्सुकता आहे, कारण हा शो 21 सप्टेंबरपासून प्रत्येक शनिवारी रात्री 8 वाजता आपल्या चाहत्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सीझन २ भारत आणि त्याच्या समृद्ध संस्कृतीचा उत्सव साजरा करणार आहे, ज्यात देशातील सुपरस्टार्स सहभागी होणार आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टपासून ते दूरदर्शी निर्माता – दिग्दर्शक करण जोहर; सौम्य आणि देखणा सैफ अली खान ते दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील महानायक ज्युनियर एनटीआर, आणि सध्या चर्चेत असलेली जान्हवी कपूरपर्यंत सर्वांना नवीन अंदाजात बघायला मिळणार आहे. या सीझनमध्ये टी20 विश्वचषक विजेते देखील दिसतील, जे चॅरेड्समध्ये खूपच हुशार आहेत. तसेच, प्रेक्षकांना दिल्ली आणि मुंबई यांच्यातील सर्वात महान शहर कोणते हे वादविवाद संपवणाऱ्या फॅब्युलस वाईव्हजदेखील पाहायला मिळतील. हे सर्व कपिल आणि त्याच्या टीमकडून केलेल्या भन्नाट विनोदांसह असेल. जेव्हा ग्लॅमरचा तडका लागेल, तेव्हा कॉमेडीचा फिव्हर आणखी वाढणार हे मात्र नक्की!
आगामी सीझनबद्दल बोलताना कपिल शर्मा म्हणाला, “जसे वचन दिले होते, आम्ही फार वेळ लावला नाही आणि लवकरच आम्ही दुसऱ्या सीझनसह नेटफ्लिक्सवर परत आलो आहोत. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या पहिल्या सीझनसाठी आम्हाला जगभरातून भरभरून प्रेम मिळालं, याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत. आमचे प्रेक्षक नेहमीच आम्हाला आपल्या कुटुंबाचा भाग मानतात आणि आम्ही त्यासाठी त्यांचे खूप कृतज्ञ आहोत. या वेळेस तुम्हाला आम्ही वेगवेगळ्या रूपात दिसू, प्रत्येक एपिसोडमध्ये आमच्या कारनाम्यांना नवीन रंग मिळेल. आम्ही अर्चनाजींमध्ये मात्र फार काही बदल करू शकलो नाही…त्यामुळे त्याच्याबाबत फार अपेक्षा ठेवू नका. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा सीझन 2 हा एकमेव आपल्या संस्कृतीचा आणि आपल्या लोकांचा उत्सव आहे. आम्ही तुमचा, आमच्या प्रिय प्रेक्षकांचा, उत्सव साजरा करत आहोत.”
तान्या बामी, सिरीज हेड, नेटफ्लिक्स इंडिया म्हणतात, “द ग्रेट इंडियन कपिल शो आमच्या सर्व सदस्यांपर्यंत पोहोचवणे 2024 मध्ये आमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे आणि आम्ही यावर्षी या शोचा दुसरा सीजन परत आणण्यासाठी खूप उत्सुक आहोत. देशभरातील सणाच्या मूडचा आदर करत, हा सीजन भारतातील सर्व गोष्टींचा उत्सव साजरा करतो. काही बहुप्रतीक्षित आणि काही आश्चर्यचकित करणारे पाहुणे असतील, आणि आम्ही बॉलिवूड, क्रिकेट आणि भारताच्या हृदयाशी संबंधित इतर गोष्टींचा सन्मान करतो. आम्ही भारतीय विनोदाच्या राजाला त्यांच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो, आणि कुटुंबांना शनिवार आणि रविवारला हास्य आणि आनंदाचा साप्ताहिक डोस देण्यासाठी सज्ज आहोत. आता वेळ आली आहे की कुटुंबे त्यांचा शनिवार आणि रविवार कपिल आणि त्यांच्या कुटुंबासह – सुनील ग्रोवर, किकू शारदा, राजीव ठाकूर आणि अर्चना पूरन सिंह यांच्यासोबत हसत-खेळत साजरा करतील.
येत्या21 सप्टेंबरपासून प्रत्येक फनीवारला रात्री 8:00 वाजता फक्त नेटफ्लिक्सवर ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा सीझन 2 पाहायला विसरू नका!
