Sunday, June 7, 2026
BusinessLatest News

‘स्‍पेक्‍टाक्‍युलर सौदी’ मोहिमेकडून भारतीय पर्यटकांना हार्ट ऑफ अरेबियाचा आनंद घेण्‍यासाठी आवाहन

पुणे: आज, सौदीचा राष्‍ट्रीय पर्यटन ब्रँड ‘सौदी वेलकम टू अरेबिया’ (Saudi Welcome to Arabia)ने भारतीय बाजारपेठेसाठी त्‍यांची पहिली एकीकृत ग्राहक मोहिम ‘स्‍पेक्‍टाक्‍युलर सौदी’ (Spectacular Saudi) लॉंच केली आहे. प्राचीन कथा व आधुनिक आविष्‍कारांच्‍या लक्षवेधक मिश्रणासह ही मोहिम सर्व अपेक्षांची पूर्तता करणाऱ्या सौदीच्‍या क्षमतेला प्रकाशझोतात आणते.

देशामध्‍ये इंग्रजी भाषेत लॉंच करण्‍यात आलेली मोहिम ‘स्‍पेक्‍टाक्‍युलर सौदी’ प्रेक्षकांना सौदीमधील सोनेरी वाळवंट, प्राचीन जल आणि अविरत आकाशाचा अनुभव देते आणि देशातील प्रतिष्ठित लँडस्‍केपेस् व अनुभवांचा उलगडा करते.

मोहिमेतील व्हिज्‍युअल्‍स सौदीला भव्‍य गंतव्‍य बनवणाऱ्या गोष्‍टींना समोर आणतात, ज्‍यामध्‍ये दिरियाच्‍या अत-तुरैफ (Diriyah’s At-Turaif) येथील प्राचीन माती-विटांच्‍या वास्‍तू, लाल समुद्राचे (Red Sea) निर्मळ पाणी, जेदाहमधील अल बलादचे (Al Balad) ऐतिहासिक रस्‍ते आणि हेग्रा (Hegra), अलउला (AlUla) येथील भव्‍य नाबातियन थडगे यांचा समावेश आहे. भारतीय आदरातिथ्‍यशी संलग्‍न होणाऱ्या सौदीच्‍या उत्‍साही व स्‍वागतार्ह संस्‍कृतीला सादर करत ही मोहिम सौदीचे भारतीय संस्‍कृतीसोबतच्‍या जवळच्‍या नात्‍याला अधिक दृढ करते. ही मोहिम जोडपे, कुटुंबे आणि संस्‍कृती व वारसामधील प्रतिष्ठित अनुभवांचा शोध घेत असलेल्‍या व्‍यक्‍तींना आतापर्यंत एक्‍स्‍प्‍लोअर न केलेल्‍या गोष्‍टींना एक्‍स्‍प्‍लोअर करण्‍याचे आवाहन करते. ही मोहिम वारसा, इतिहास व आधुनिक आश्‍चर्यांमध्‍ये सामावलेल्‍या स्‍पेक्‍टाक्‍युलर सौदीच्‍या गाथेला सादर करते, तसेच संभाव्‍य भारतीय पर्यटकांना शोधाचा अविस्‍मरणीय प्रवास सुरू करण्‍यास प्रेरित करते. 

या मोहिमेबाबत मत व्‍यक्‍त करत सौदी टूरिझम ऑथोरिटी येथील एपीएसी मार्केट्सचे अध्‍यक्ष अलहसन अल्‍दाबाग म्‍हणाले, ”भारतीय पर्यटकांना वास्‍तविक व अद्वितीय अनुभवांचे दीर्घकाळापासून कौतुक केले आहे. ते प्रख्‍यात गंतव्‍य, संस्‍कृती व उत्तम पाककलांचा शोध घेण्‍यास उत्‍सुक असतात आणि हीच बाब सौदीने ऑफर केली आहे. दिरिया, अल बलाद आणि अलउलामधील हेग्रा या सौदीच्‍या आठ युनेस्‍को वर्ल्‍ड हेरिटेज स्‍थळांपैकी तीन प्रतिष्ठित गंतव्‍यांसह ते गतकाळातील इतिहासाबाबत जाणून घेऊ शकतात, तसेच सर्वोत्तम पॅकेजेससह जागतिक दर्जाची संस्‍कृती, साहस व पाककलांचा अनुभव घेऊ शकतात.

आम्‍ही भारतीयांना आमच्‍या वारसाचा प्रमुख भाग असलेल्‍या आणि भारतीय संस्‍कृतीशी संलग्‍न असलेल्‍या उत्‍साहपूर्ण सौदी वेलकमचा अनुभव देण्‍यासाठी उत्‍सुक आहोत. भारताचे आमच्‍या मनात अत्‍यंत विशेष स्‍थान आहे आणि आम्‍ही २०३० पर्यंत भारताला पहिल्‍या क्रमांकाची स्रोत बाजारपेठ बनवण्‍याप्रती कटिबद्ध आहोत. २०२३ मध्‍ये, १.६ दशलक्ष भारतीयांनी सौदीला प्रवास केला. आम्‍हाला हार्ट ऑफ अरेबियाचा अनुभव घेण्‍यासाठी भारतीय पर्यटकांचे स्‍वागत करताना आनंद होत आहे.”

गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत भारतामधून विश्रांतीसाठी देण्‍यात आलेल्‍या भेटींमध्‍ये २४० टक्‍के वाढ होण्‍यासह  सौदीला भेट देणे यापेक्षा सोपे कधीच नव्‍हते, जेथे ३३० हून अधिक थेट साप्‍ताहिक फ्लाइट्स आणि ८ एअरलाइन ऑपरेटर्स उत्तम सेवा देत आहेत. युनायटेड स्‍टेट्स ऑफ अमेरिका, युनायटेड किंग्‍डम किंवा कोणत्‍याही शेंगन देशामधून वैध पर्यटक किंवा व्‍यवसाय व्हिसा असलेले, तसेच प्रवेशाचा शिक्‍का मारलेला पुरावा असलेले भारतीय सौदी आंतरराष्‍ट्रीय विमानतळांवर आगमनानंतर ईव्हिसा (eVisa) आणि व्हिसासाठी पात्र आहेत. या उल्‍लेख करण्‍यात आलेल्‍या निकषांतर्गत पात्र नसलेले भारतीय भारतभरातील ११ तशीर सेंटर्सच्‍या माध्‍यमातून व्हिसासाठी अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी, सौदी व्हिसा आवश्‍यकतांकरिता एक थांबा https://www.visitsaudi.com/en/plan-your-trip/visa-regulations ला भेट द्या. भारतीय पर्यटक स्‍टॉपओव्‍हर व्हिसासाठी (Stopover visa) देखील अर्ज करू शकतात, जो जवळपास ९६ तासांसाठी वैध आहे आणि सौदीया एअरलाइन व फ्लायनास वेबसाइटवर ९० दिवस अगोदर प्राप्‍त करता येऊ शकतो.  

हार्ट ऑफ अरेबियाला एक्‍स्‍प्‍लोअर करण्‍यासाठी https://www.visitsaudi.com/en/campaigns/india येथे भेट द्या आणि भारतातील १२ ट्रेड सहयोगींकडून विशेष पॅकेजेस् व ऑफर्सच्‍या उपलब्‍धतेसह भावी गेटवे बुक करा.     

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading