Sunday, June 7, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘बिग बॉस मराठी’च्या घरात निक्कीची मनमानी; नियमही मोडलेत*

Bigg Boss Marathi Day 38 : ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचला आहे. पहिल्या दिवसापासूनच हा कार्यक्रम प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. गेल्या आठवड्यात अरबाजचं रौद्र रुप पाहायला मिळालं होतं. यंदाच्या या कठीण आठवड्यात प्रेक्षकांना अनेक नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. या आठवड्यात कोण रद्दी ठरलं हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. सहाव्या आठवड्यातील नॉमिनेशन टास्कमध्ये अनेकांचे नंबर लागले आहेत.

प्रोमोमध्ये निक्की वर्षा ताईंना म्हणतेय,”मी कोणतीही ड्यूटी करणार नाही”. त्यावर वर्षा ताई निक्कीला म्हणतात,”तू अशी मनमानी करू शकत नाही”. आजच्या भागात निक्की बिग बॉसचे अनेक नियम मोडताना दिसणार आहे. तर निक्की झोपेचे नाटक करत असल्याने आर्या तिच्यावर थंड पाणी ओतणार असल्याचं म्हणते. आता निक्कीला बिग बॉस काय शिक्षा देणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

‘हे’ सदस्य झालेत नॉमिनेट

‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या आठवड्यात नॉमिनेशन टास्कमध्ये घन:श्याम दरवडे, आर्या जाधव, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, अरबाज पटेल हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत.
आता या सदस्यांपैकी कोण आपला गेम प्लॅन अधिक चांगला आखणार? कोण सेफ होणार आणि कोण अनसेफ होणार? याकडे ‘बिग बॉस’ प्रेमींचं लक्ष लागलं आहे.

‘BIGG BOSS मराठी’, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर

ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading