‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांचा दुष्मन कोण? जाणून घ्या…”
Bigg Boss Marathi New Season Day 30 : ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन चांगलाच धुमाकूळ घालत आहे. सर्वत्र या सीझनचीच चर्चा आहे. या आठवड्याचा ‘भाऊचा धक्का’ चांगलाच गाजला आहे. आता या आठवड्यात सदस्य का धमाका करणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. कालच्या भाऊच्या धक्क्यानंतर निक्की आता एकटी पडली आहे. त्यामुळे तिचा आता एकटीचा खेळ रंगणार आहे.
प्रोमोमध्ये आर्या अरबाजला म्हणत आहे,”आता आपल्या सर्वांचा मेन दुष्मन एकच झालाय”. त्यावर अरबाज निक्की असं उत्तर देतो. आर्या अरबाजला पुढे म्हणते,”विसरू नकोस”. अरबाज म्हणतो,”निक्कीला खूप त्रास द्यायचाय”. त्यावर आर्या म्हणते,”हो…पूर्णपणे”. अरबाज पुढे म्हणतो,”तू अभिजीतला इतका त्रास दे तिला काही नाही होणार”. यावर निक्की आणि आर्याला म्हणते,”किव येते मला त्या लोकांची”.
‘बिग बॉस मराठी’चा आजचा भाग खूपच रंजक असणार आहे. या आठवड्यात निक्कीचा चांगलाच बोलबाला आहे. काल इरिना बाहेर पडल्यानंतर आता या आठवड्यात कोणता सदस्य बाहेर पडणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.
‘BIGG BOSS मराठी’, भाऊचा धक्का, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर
ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM
