Friday, November 6, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘बिग बॉस मराठी’च्या घरावर आलंय मोठं संकट; तो आलाय…”

Bigg Boss Marathi New Season Day 30 :’बिग बॉस मराठी’च्या घरातून काल इरिना रूडाकोवा बाहेर पडली. गेले चार आठवडे सर्वच सदस्यांनी प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं. बघता बघता या नव्या सीझनचा आता पाचवा आठवडा सुरू झाला आहे. या आठवड्यात मात्र घरातील सदस्यांची झोप उडणार आहे. भाऊच्या धक्क्यावर रितेश म्हटल्याप्रमाणे हा आठवडा खूप खास असणार आहे. सदस्यांची उडालेली झोप पाहताना प्रेक्षकांना मात्र मनोरंजनाची चांगलीच मेजवानी मिळणार आहे.

‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो घाबरवणारा आहे. प्रोमोमध्ये बिग बॉस म्हणत आहेत,”सावधान… या घरावर आलंय एक मोठं संकट… तो आलाय.. मानकाप्या…”. प्रोमोमध्ये घरातील सर्व सदस्यांची झोप उडालेली असून ते चांगलेच घाबरलेले दिसत आहेत. तसेच घरात एका आरश्यावर लिहिलेलं आहे,”एकटं फिरू नका…नाहीतर..मानकाप्या”.

बिग बॉस मराठीच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊने जान्हवीला चांगलीच शिक्षा दिली आहे. आता आजपासून घरातील सर्वच सदस्य डेंजर झोनमध्ये असणार आहेत. आता यातून घरातील सदस्य आपला कसा मार्ग काढणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. आपल्या खेळीने इतरांना घाबरवणारे सदस्य आता स्वत:चं भित्रे झालेले आहेत.

‘BIGG BOSS मराठी’, भाऊचा धक्का, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर

ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM

Leave a Reply