बटन बॅटरी गिळलेल्या दोन वर्षाच्या मुलीवर आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल मध्ये यशस्वीरीत्या उपचार
पुणे : पिंपरी – चिंचवड स्थित दोन वर्षीय मुलीने खेळता खेळता बटन बॅटरी गिळल्यामुळे तिच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत तिच्या आई – वडिलांनी तिला आपत्कालीन उपचारासाठी आदित्य बिर्ला हॉस्पिटल येथे तातडीने उपचारासाठी दाखल केले.आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल येथील आपत्कालीन वैद्यकीय टीमने कन्सल्टण्ट, पेडिएट्रिक गॅस्ट्रोएण्टेरोलॉजिस्ट डॉ. (मेजर) प्रतीक अग्रवाल यांच्या तज्ञ केअरअंतर्गत मुलीवर यशस्वी उपचार केले. डॉक्टरांनी आपल्या अपवादात्मक कौशल्याचा वापर केला, मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याच्या एका तासाच्या आत एण्डोस्कोपिकच्या माध्यमातून बटन बॅटरी बाहेर काढली आणि मुलीचे जीवन वाचवले.
हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर मुलीला त्वरित आपत्कालीन एण्डोस्कोपिक प्रक्रियेसाठी नेण्यात आले. एण्डोस्कोपीमधून बॅटरी असलेल्या अन्ननलिकेमधील भाग भाजल्याचे दिसून आले, पण सुदैवाने, छिद्र पडण्याची कोणतीही चिन्हे नव्हती. ती हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर एका तासाच्या आत डॉ. अग्रवाल आणि त्यांच्या टीमने बटन बॅटरी यशस्वीपणे काढून टाकली.बारकाईने देखरेख केल्यानंतर मुलीची अधिक काळजी घेण्यात आली आणि वैद्यकीय शिफारशीनुसार हळूहळू आहार सुरू करण्यात आला. डॉ. अग्रवाल आणि त्यांच्या टीमने केलेल्या त्वरित व प्रभावी हस्तक्षेपामुळे रूग्ण बरी झाली आणि प्रकृतीमध्ये उत्तम सुधारणा झाल्यामुळे पाच दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात आला.
आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल येथील पेडिएट्रिक कन्सल्टण्ट, गॅस्ट्रोएण्टोरोलॉजिस्ट डॉ. (मेजर) प्रतीक अग्रवाल म्हणाले, ”मुलीला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले तेव्हा तिला तीव्र वेदना व उलट्या होत होत्या. अशा लहान रूग्णावर यशस्वी एण्डोस्कोपी करण्यामध्ये यशस्वी ठरल्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा जाणीव झाली की मुलांच्या उपचारामध्ये अचूकता, परिश्रम आणि बारकाईने काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक यशस्वी प्रक्रियेमधून लहान रूग्णांच्या स्वास्थ्याप्रती आमची समर्पितता दिसून येते.”
या केसमधून बटन बॅटरी गिळाल्याच्या स्थितींमध्ये त्वरित वैद्यकीय हस्तक्षेपाचे महत्त्व दिसून येते, जेथे बॅटरी गिळल्यामुळे गंभीर दुखापती होऊ शकतात किंवा वेळेवर उपचार न केल्यास मृत्यू देखील होऊ शकतो. आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमधील टीमला कन्सल्टण्ट पेडिएट्रिक गॅस्ट्रोएण्टेरोलॉजिस्ट डॉ. प्रतीक अग्रवाल यांच्या नेतृत्वांतर्गत या केसच्या यशस्वी निष्पत्तीप्रती योगदान देण्याचा अभिमान वाटतो.
एम.डी. (पेडिएट्रिक्स), एफपीजीएचएन डॉ. (मेजर) प्रतीक अग्रवाल फॉरेन बॉडी रिमूव्हल, लिव्हर बायोप्सी, अप्पर/लोअर एण्डोस्कोपी, एण्डोस्कोपित ड्युओडेनल बायोप्सी, एण्डोस्कोपिक ग्लू थेरपी, एण्डोस्कोपिक पॉलिपेक्टोमी, एण्डोस्कोपित वेरिसीएल लिगेशन इत्यादी मध्ये स्पशोलिस्ट्स आहेत. त्यांनी आतापर्यंत ३००हून अधिक एण्डोस्कोपिक प्रक्रिया आणि १००हून अधिक लिव्हर बायोप्सी केल्या आहेत. तसेच, यकृत व आतड्यांसंबंधी विविध आजारांसह अॅक्यूट लिव्हर फेल्युअर व गंभीर अतिसाराने पीडित मुलांवर सकारात्मक निष्पत्तींसह यशस्वीपणे उपचार केला आहे.
