Sunday, June 7, 2026
ENTERTAINMENTLatest News

रक्षाबंधनाच्या दिवशी भावा बहिणीच्या नात्यात पडली फूट; निक्की अन् छोटा पुढारीमध्ये मोठा वाद

Bigg Boss Marathi New Season Day 23 : ‘बिग बॉस मराठी’ हा भावनांचा खेळ आहे. आता चौथा आठवडा सुरू झाला असून सदस्यांचे खरे रंग दिसायला सुरुवात झाली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सदस्यांनी तिन आठवड्यातच नाती निर्माण केली आहेत. छोटा पुढारी आणि निक्कीमध्ये बहिण-भावाचं नातं निर्माण झालेलं पाहायला मिळत आहे. पण आज रक्षाबंधनाच्या दिवशीच या भावा बहिणीच्या नात्यात फूट पडलेली पाहायला मिळणार आहे. निक्की आणि छोटा पुढारीमध्ये मोठा वाद झाला आहे.

प्रोमोमध्ये निक्की घन:श्यामला म्हणतेय,”तू फेक आहेस”. त्यावर घन:श्याम तिला विचारतो,”काय फेक वागलोय ते तर सांग.. तू किती आपली आहेस हे अख्ख्या जनतेला दिसतंय… तुला सख्ख्या बहिणीचा दर्जा दिला होता मी.. यावर निक्की म्हणते,”नको देऊ. त्यावर घन:श्याम म्हणतो,”निक्कू ताई बोलल्यामुळेच घात झालाय ना”.

निक्की तांबोळी आणि छोटा पुढारी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहेत. आम्ही दोघे बहीण -भाऊ म्हणत छोट्या पुढारीने निक्की सोबत मैत्री केली. पण दोघांच्या पप्पी आणि झप्पीमुळे प्रेक्षकांनी त्यांची खिल्ली उडवली. आता ऐन रक्षाबंधनच्या दिवशीच त्यांच्यात मोठा वाद झालेला पाहायला मिळेल.

‘BIGG BOSS मराठी’ दररोज, रात्री 9 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि @officialjiocinema वर

ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading