Wednesday, June 17, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर खुनाचा गुन्हा

ढाका: सध्या भारतात आश्रयाला असलेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर बांगलादेशात किराणा दुकानदाराच्या मृत्यूला कारणीभूत असल्याबद्दल खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होत आहे.

बांगलादेशात हिंसेचा अगडोम उसळल्यानंतर शेख हसीना यांनी राजीनामा देऊन भारतात आश्रय घेतला आहे. बांगलादेशात सत्तेवर असलेल्या अंतरिम सरकारने शेख हसीना यांना पुन्हा बांगलादेशात यायचे असेल तर त्यांचे स्वागत आहे, असे विधान केले आहे. मात्र, शेख हसीना यांनी पदत्याग करून देश सोडल्यानंतर जमावाने पंतप्रधान निवासस्थानाची अक्षरशः लूट केली होती. बांगलादेशचे राष्ट्रपिता मानले जाणारे मुजीब उर रहमान यांचा पुतळा ही जमावाने उध्वस्त करून टाकला आहे. अशा परिस्थितीत शेख हसीना जमावाच्या तावडीत सापडल्या असत्या तर काय झाले असते याचा अंदाज करणे सहज शक्य आहे.

मोहम्मदपूर येथे आंदोलनाच्या समर्थनार्थ निघालेल्या रॅलीवर पोलिसांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात किराणा दुकानदार अबू शहीद यांचा मृत्यू झाला. त्याबद्दल अवामी लीग पक्षाचे सरचिटणीस उमेद कादर, माजी गृहमंत्री असदुतझमन खान कमाल आणि पोलीस महानिरीक्षक अब्दुल्ला अलमामून यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यात मृत दुकानदाराच्या हितचिंतकाने दाखल केलेल्या तक्रारीवरून शेख हसीना यांना देखील आरोपी करण्यात आले आहे. कुणासारखा गंभीर गुन्हा दाखल झाल्यामुळे शेख हसीना यांच्या समोरील अडचणीत वाढ होऊ शकते.

शेख हसीना सध्या भारतात असल्या तरीही त्यांना लंडनला जायचे होते. मात्र, त्यांना आश्रयच काय पण प्रवेश करण्यासाठीही ब्रिटनने परवानगी दिली नाही. अमेरिकेनेही त्यांचा विसा रद्द केला आहे. बांगलादेशात पुन्हा जाण्याचा विचार केल्यास त्यांच्या जीवाला धोका तर आहेच. शिवाय कुणाच्या गुन्ह्यात त्यांना अटकही होऊ शकते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading