थकलेल्या छोट्या पुढारीची कहाणी; टास्क हरल्याने घन:श्यामच्या आसवांचा बांध फुटला!
Bigg Boss Marathi New Season Day 11 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात काल पहिलं कॅप्टनसीचं कार्य पार पडलं. ‘कॅप्टनसीची बुलेट ट्रेन’ असं या कॅप्टनसी कार्याचं नाव होतं. या टास्कमध्ये ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर विजयी झाली आणि ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनला पहिला कॅप्टन मिळाला. पण दुसरीकडे आपल्याला कॅप्टन होता आलं नाही म्हणून अरबाज, निक्की, वैभव, जान्हवी यांचा राग अनावर होतो. घन:श्यामला खूप वाईट वाटतं. अंकिता कॅप्टन झाल्यावर डीपी अंकिताला थेट उचलून कॅप्टनच्या खोलीत नेतात. तर अभिजीत तिच्यासाठी गाणं म्हणतो. यानंतर गेम अनफेअर झाला म्हणून घन:श्याम ओक्साबोक्शी रडू लागतो.
प्रोमोमध्ये ‘छोटा पुढारी’ घन:श्याम दरवडे धनंजय पोवारकडे आपल्या मनातील भावना व्यक्त करताना दिसून येत आहे. टास्कमध्ये हरल्याने घन:श्यामला खूप वाईट वाटत आहे. धनंजयकडे येऊन घन:श्याम म्हणतोय,”माझ्या घरच्यांना म्हणायचंय तुमचा मुलगा काही करू शकत नाही आहे. उंची नाही त्यामुळे लोकंही म्हणतात यांचा मुलगा ‘बिग बॉस’मध्ये गेलाय कसा?”. यावर घन:श्यामला समजावत धनंजय म्हणतो,”शरीराची उंची मापता आली नाही, त्याला मनाची उंची काय माफता येणार?”.
अंकिता वालावलकर ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता कॅप्टन म्हणून वावरणार आहे. दिलेल्या जबाबदाऱ्या ती कशी पूर्ण करणार? कामे वाटताना घरातील सर्व सदस्यांना समान न्याय देईल का? हे पाहावे लागेल.
‘BIGG BOSS मराठी’ दररोज, रात्री 9 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि @officialjiocinema वर.
ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM
