Sunday, June 7, 2026
Latest News

डॉ. जेन गुडॉल यांचा वारसा साजरा करण्यासाठी जेन गुडॉल इन्स्टिट्युट इंडिया आणि म्युझियम ऑफ सोल्युशन्स यांच्यातर्फे अनोख्या प्रदर्शनाचे आयोजन  

मुंबई : मुंबईतील एक अद्वितीय बालसंग्रहालय द म्युझियम ऑफ सोल्युशन्स (MuSo) जेन गुडॉल इन्स्टिट्युट इंडियाच्या सहकार्याने डॉ. जेन गुडॉल यांच्या जीवनावर आणि काळावर आधारित असे पहिलेवहिले अनोखे प्रदर्शन भरविणार आहे. “सेलिब्रेटिंग जेन” नावाचे हे अनोखे प्रदर्शन जगप्रसिद्ध ॲथॉलॉजिस्ट आणि संवर्धनवादी डॉ. जेन गुडॉल यांच्या जीवन आणि कार्याविषयी समग्र माहिती पुरवेल. डॉ. जेन गुडॉल या टांझानिया येथील गोम्बेमधील वन्य चिंपांझींवरील त्यांनी केलेल्या आजीवन संशोधनासाठी प्रसिद्ध आहेत. हे प्रवासी प्रदर्शन डॉ. जेन गुडॉल यांच्या असाधारण प्रवासाचे भारतातील पहिले अधिकृत प्रदर्शन आहे.

या प्रदर्शनाचा एक भाग म्हणून JGII आणि MuSo जेन यांचा तंबू पुन्हा नव्याने उभारणार आहेत. त्यामुळे मुलांना आणि अभ्यागतांना त्या आपल्या चिंपांझी मित्रांसोबत दैनंदिन जीवन कसे व्यतित करायचे, याचा मनमोहक अनुभव मिळेल. हे जंगली चिंपांझी सेलिब्रेटिंग जेन प्रदर्शनात केंद्रस्थानी आहेत. त्यांच्यामुळे जेन गुडॉल यांच्या जीवनातील सखोल माहिती आणि ‘रूट्स अँड शूट्स’ या त्यांच्या युथ प्रोग्रॅममधून त्यांनी निर्माण केलेला महत्त्वपूर्ण प्रभाव कळेल. JGII आणि MuSo सहकार्याचे उद्दिष्ट जेन यांची कथा अधिकाधिक जवळची, संबंधपूर्ण बनवत, त्यांचा वारसा आणि अभ्यागत यांच्यातील संबंध वैयक्तिक पातळीवर अधिक जवळचे निर्माण करणे हे आहे.

म्युझियम ऑफ सोल्युशन्सच्या संस्थापक तन्वी जिंदाल शेटे यांच्या मते, “तरुणांच्या मनात कुतूहल जागृत करणे आणि निसर्गाविषयी प्रेम वाढविणे हे आमचे ध्येय या प्रदर्शनातून साकार होत आहे. डॉ. जेन गुडॉल यांचा प्रेरणादायी प्रवास शेअर करून विद्यार्थी, मुले आणि कुटुंबांना वन्यजीव संरक्षण व पर्यावरणीय कारभारासाठी जागरूक, प्रेरणादायी बनविण्याचा आमचा उद्देश आहे. प्राणी आणि मानवांबद्दलच्या आपल्या समजुतीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी डॉ. गुडॉल यांना प्रचंड आव्हाने पार करावी लागली. डॉ. गुडॉल यांचे जीवन आणि वारसा आपल्याला हेच शिकवितात. संवादात्मक सत्रे आणि कृतिशील उपक्रम यांच्या माध्यमातून मुलांना त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल कळेल आणि शाश्वत भविष्याच्या दिशेने कृती करण्यायोग्य पावले उचलण्यासाठी सक्षमतेची भावना त्यांच्यात रुजेल. जेन गुडॉल इन्स्टिट्युट इंडियाबरोबरचे हे सहकार्य एक समृद्ध शैक्षणिक अनुभव सादर करते. त्यायोगे खऱ्याखुऱ्या आदर्श व्यक्तिमत्त्वाचा गौरव करते आणि बदल घडविणाऱ्या पुढील पिढीला प्रेरित करते.”

जेन गुडॉल इन्स्टिट्युट इंडियाचे एज्युकेशन डायरेक्टर (शिक्षण संचालक) केटी बागली यांच्या मते, “हे विशेष प्रदर्शन प्रत्यक्षात सादर करण्यासाठी म्युझियम ऑफ सोल्युशन्सशी सहयोग करण्याबाबत आम्ही खूप रोमांचित आहोत. डॉ. जेन गुडॉल यांचा अतुलनीय प्रवास आणि संवर्धनाप्रती असलेले समर्पण याने जगभरातील लाखो लोकांना प्रेरणा दिली आहे. हे प्रदर्शन केवळ त्यांचा वारसा साजरे करत नाही, तर तरुणांच्या मनात आशा आणि वन्यजीव संरक्षणाची आवड निर्माण करण्याचाही यामागचा उद्देश आहे. आकर्षक उपक्रम आणि शैक्षणिक कार्यक्रमांद्वारे, आम्ही अभ्यागतांना शाश्वत भविष्यासाठी कृतियोग्य पावले उचलण्यास सक्षम बनविण्याची आकांक्षा बाळगत आहोत.”

‘सेलिब्रेटिंग जेन’ प्रदर्शन म्युझियम ऑफ सोल्युशन्स येथे 5 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर 2024 या काळात सकाळी 10 पासून सुरू राहील. मुलांना अधिक चांगल्या भविष्यासाठी सकारात्मक कृती करण्यास प्रोत्साहित करत, हे MuSo च्या शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG) शिक्षणासाठीच्या बांधिलकीशी सुसंगत आहे. मुले आणि अभ्यागतांना डॉ. जेन गुडॉलच्या असाधारण प्रवासाला समर्पित असलेला संपूर्ण मजला जेनचा परिचय, सुरुवातीचे जीवन, गोम्बेमधील आयुष्य, सेलिब्रेटिंग जेन आणि चिंपांझी गाइडेड झोन अशा पाच वेगवेगळ्या विभागांमधून पाहण्याची संधी मिळेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading