कै. कॅप्टन शिवरामपंत दामले स्मृतिदिनानिमित्त आंतर शालेय क्रॉसकंट्री २०२४ स्पर्धेचे 1 ऑगस्ट रोजी आयोजन !!
पुणे : महाराष्ट्रीय मंडळ पुणे सेठ दगडूराम कटारिया हायस्कूल आयोजित कैलासवासी कॅप्टन शिवरामपंत दामले स्मृतीदिनानिमित्त आंतरशालेय क्रॉस कंट्री स्पर्धा 2024 या स्पर्धेचे आयोजन दिनांक 26 जुलै शुक्रवारी करण्यात आले होते, परंतु पुणे जिल्ह्यात पडलेल्या अतिवृष्टीमुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. महाराष्ट्रीय मंडळाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. 1 ऑगस्ट 2024 गुरुवार सकाळी साडेसात ते अकरा या वेळेत महाराष्ट्रीय मंडळ मुकुंद नगर येथे आयोजन करण्यात आले आहे.
यावर्षी स्पर्धेचे अकरावे वर्ष आहे. कैलासवासी कॅप्टन शिवरामपंत दामले आंतरशालेय क्रॉस कंट्री स्पर्धेला दरवर्षी मोठा प्रतिसाद मिळत असून पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी अशी आंतरशालेय क्रॉस कंट्री स्पर्धा असे स्वरूप मिळाले आहे. पुणे जिल्ह्यातील बाराशे खेळाडूंनी या स्पर्धेसाठी नाव नोंदणी केलेली आहे पुणे जिल्ह्यातील व शहरातील नामांकित शाळांनी आपला सहभाग यामध्ये नोंदवला आहे. पुणे जिल्ह्यासाठी सहा गटातील १)अकरा वर्षे मुले /मुली २)तेरा वर्षे मुले /मुली ३)पंधरा वर्षे मुले /मुली यांना एक लाख रुपयाची बक्षिसे देण्यात येणार आहेत.
सदर स्पर्धा महाराष्ट्रीय मंडळ ,मुकुंद नगर, पुणे येथील प्रांगणात होणार असून स्पर्धेसाठी एक किलोमीटर, दोन किलोमीटर व तीन किलोमीटर धावण्यासाठी मार्ग तयार करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी श्री हर्षल निकम ९९२३१८२१७१ यांच्याशी संपर्क साधावा.
