Monday, June 8, 2026
ENTERTAINMENTLatest News

“कहो ना प्यार हैं’चे गाणं जिथे शूट केलं त्या आयलंडवर गेलो अन् पाऊस कोसळायला लागला – हृषिकेश शेलार

प्रेक्षकांना  घरबसल्या ताजेतवाने करण्यासाठी ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिका पोहचली आहे थायलंडला. जिथेले आकर्षक समुद्रकिनारे, मंत्रमुग्ध करणारा निसर्ग आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थचा आस्वाद घेताना दिसणार आहेत तुमचे लाडके अक्षरा- अधिपती.  सध्या सोशल मीडियावर एकाच व्हिडिओचा कल्ला सुरु आहे तो म्हणजे अधिपती-अक्षराचा थायलंड मधला ‘कहो ना प्यार हैं’ गाण्याचा प्रोमो जो थायलंडच्या समुद्रकिनाऱ्यावर शूट केला गेला आहे. कारण अधिपती-अक्षरा हनिमूनसाठी पोहचले आहेत थायलंडला.

याबाबद हृषिकेश शेलारने आपला अनुभव आणि आनंद व्यक्त करताना सांगितले की, ” माझी मनापासून इच्छा होती की परदेशात जाऊन शूटिंग करावं ती इच्छा माझी इथे पूर्ण झाली.  मुंबई मध्ये आमची  किमान ५०-६० जणांची टीम असते पण थायलंडला आम्ही  १५-१६ जणच होतो तिथे शूटिंगच सगळं सांभाळायला आणि ती एक वेगळीच तारे वरची कसरत होती. नवीन देश आणि तिथे जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंगची परवानगी काढणे, तिकडच्या भाषेमध्ये संवाद साधून काम करणे अवघड काम होत पण त्यात खूप मज्जा आली. आमची टीम, निर्माते, चॅनल, सर्वच इतके सपोर्टिव्ह आहेत की सगळं छानपणे पार पडलं. तुम्ही अधिपती-अक्षरावर चित्रित झालेलं जे गाणं पाहत आहात  ते आम्ही एका आयलंडवर शूट केलं . तिथे आमच्यकडे खूप कमी वेळ होता आणि त्यात आम्हाला गाणंही शूट करायच होत आणि सीन सुद्धा करायचा होता.

ह्याच आयलंडवर ‘कहो ना प्यार हैं’ च्या  ओरिजिनल गाण्याचं चित्रीकरण झालंय. त्याच ठिकाणी आम्ही ही ते गाणं पुन्हा रीक्रिएट केलं खूप भन्नाट अनुभव होता. पण ते चित्रीकरण करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले कारण आमच्या हातात एकचं दिवस होता. त्यात ही जोरदार पाऊस आला मध्यंतरी आम्ही बोटचा प्रवास करून त्या आयलंडवर पोहचलो शूटसाठी सुरुवात केली आणि पाऊस कोसळायला लागला आम्हाला शूट थांबवावं लागलं. असाही ही प्रश्न पडला की आम्हाला परत जात येईल का इथून. खूप पाऊस होता तिथे. जवळपास २ तासांनी पाऊस थांबला आणि आम्ही गाण्याच्या शूटिंगला सुरुवात केली. खूपच छान अनुभव होता.”

तिथे अजून काय काय करणार आहेत हे तुम्हाला बघायला मिळणार आहे ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत दररोज रात्री ८ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading