Union Budget 2024 : अर्थसंकल्पात बिहार, आंध्र प्रदेशाला ‘रिटर्न गिफ्ट’
दिल्ली : मोदी 3.0 चा पहिला अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. यामध्ये जेडीयू आणि टीडीपी या दोन पक्षांनी मोदी सरकारला दिलेल्या पाठिंब्याच्या बदल्यात बिहार व आंध्र प्रदेशाला ‘रिटर्न गिफ्ट’ देण्यात आलं आहे. या दोन्ही राज्यांसाठी बजेटमध्ये मोठी तरतूद करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशाच्या अमरावती राजधानीसाठी विशेष पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी 15 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर बिहारसाठी महाबोधी कॉरीडोरची घोषणा करण्यात आली असून त्यासाठी देखील 26 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
पीएम मुद्रा योजने अंतर्गत आता 20 लाख रुपयांचं कर्ज
या सरकारी योजनेअंतर्गत मुद्रा कर्जाची मर्यादा दुप्पट करण्यात आली आहे. यापूर्वी या योजनेअंतर्गत एमएसएमईंना 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिलं जात होतं, ते आता 20 लाख रुपये करण्यात आलं आहे.
महाबोधी, विष्णूपद मंदिरासाठी कॉरिडोअरची निर्मिती
- बिहारमधील महाबोधी मंदिरासाठी कॉरीडोअरची निर्मिती केली जाणार
- गया येथील विष्णूपद मंदिरासाठी कॉरिडोअरची निर्मिती
- पर्यटनाच्या विकासासाठी सरकार प्रयत्न करणार
9 सूत्री पाच योजनांची घोषणा
- कृषी क्षेत्रातील उत्पादकता आणि लवचिकता
2. रोजगार आणि कौशल्ये
3. सर्वसमावेशक मानव संसाधन विकास आणि सामाजिक न्याय
4. उत्पादन आणि सेवा
5. शहरी विकास
6. ऊर्जा संवर्धन
7. पायाभूत सुविधा
8. नवोपक्रम, संशोधन आणि विकास
9. नवीन पिढी सुधारणा
नोकरदार वर्गासाठी घोषणा
- EPFO अंतर्गत पहिल्यांदाच नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, एका महिन्याच्या पगाराच्या 15,000 रुपयांपर्यंत थेट लाभ हस्तांतरणाद्वारे तीन हप्त्यांमध्ये जारी केला जाईल.
- कंपनी आणि कर्मचारी दोघांनाही नोकरीच्या पहिल्या चार वर्षांत EPFO योगदान अंतर्गत थेट प्रोत्साहन दिलं जाईल.
- नियोक्त्यांना पाठिंबा देण्यासाठी, सरकारनं अर्थसंकल्पात म्हटलं आहे की, अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या मासिक योगदानाची दोन वर्षांसाठी 3 हजार रुपयांपर्यंत परतफेड केली जाईल.
- नोकरदारांसाठी स्टॅडर्ड डिडक्शन 50 हजारांहून 75 हजारांवर
