Union Budget 2024 : सोने, चांदी स्वस्त, ग्राहकांनी खरेदीसाठी केली गर्दी
मुंबई : लोकसभेत आज NDA सरकारचा अर्थसंकल्प सादर झाला. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सोने, चांदी यावरील कस्टम ड्युटी १० टक्क्यांवरून ६ टक्के इतकी कमी करत असल्याची घोषणा केली. या घोषणेचा तात्काळ प्रभाव बाजारपेठेत लागू झाल्याने देशभरातील सोने, चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांनी बाजारपेठेत सोने, चांदी खरेदीसाठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
गेल्या वर्षभरा पासून सोने, चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे ग्राहकांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली होती. सोन्याची स्टॅम्प ड्युटी कमी करण्यात आली. तसेच, जीएसटी व सेल्स टॅक्स मिळून कमीत कमी 6 टक्क्यांपर्यंत स्टॅम्प ड्युटी कमी झाली आहे. त्यामुळे, मुंबई मध्ये 5 हजार रुपयांनी सोने स्वस्त झाले आहे. तर पुणे शहरात सोने ३ हजारांनी स्वस्त झाले आहे. या प्रमाणेच बुलढाण्यात ६ हजारांनी, सोलापुर, परभणी, अमरावतीत २ हजारांनी तर हिंगोलीत सोने ३ हजारांनी स्वस्त झाले आहे.
या कारणामुळे सोने झाले स्वस्त
सोने, चांदीवरील सीमा शुल्क – 6 टक्के
प्लॅटिनमवरील सीमा शुल्क- 6.4 टक्के
अमोनिअम नायट्रेटवरील सीमा शुल्क 7 टक्क्यांवरून 10 टक्के करण्यात आले आहे.
आणखी काय स्वस्त ?
मोबाईल चार्जरच्या कमिती 15 टक्क्यांनी कमी होणार
मोबाईल हँडसेटही आता स्वस्त होणार आहे.
मोबाईलचे सुटे भागही आता स्वस्त होणार आहेत
सोलर पॅनल स्वस्त
कॅन्सर वरील औषध स्वस्त होणार
