Sunday, June 7, 2026
Latest NewsSportsTOP NEWS

BCCI ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंसाठी साडेआठ कोटी देणार – जय शहा

नवी दिल्ली:  देशात क्रिकेटचा विकास करण्याबरोबरच इतर क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देण्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे धोरण असून यावर्षीच्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंसाठी भारतीय ऑलिंपक संघटनेकडे साडेआठ कोटी रुपयांचा निधी सुपूर्द केला जाणार आहे, अशी घोषणा नियमक मंडळाचे सचिव जय शहा यांनी केली आहे. 

टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक जिंकून भारतात परतलेल्या खेळाडू,  प्रशिक्षक आणि सहाय्यकांच्या पथकाला भरघोस रकमेची बक्षिसे दिल्यानंतर बीसीसीआयने ऑलिंपिकमध्ये खेळल्या जाणाऱ्या इतर क्रीडा प्रकारांनाही प्रोत्साहन देण्याचे धोरण अंगीकारले आहे. त्यानुसार यावर्षी ऑलिंपिक मध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे. 

पॅरिस ऑलिंपिक 2024 मध्ये भारताचे 117 खेळाडूंचे पथक सहभागी झाले आहे. त्यांच्याबरोबर प्रशिक्षक, अधिकारी आणि सहाय्यक कर्मचारी यांचे 74 जणांचे पथकही रवाना झाले आहे. या स्पर्धा 26 जुलै ते 11 ऑगस्ट या कालावधीत पार पाडल्या जाणार आहेत. अथलेटिक्स, नेमबाजी, टेबल टेनिस, बॅडमिंटन, कुस्ती, तिरंदाजी, मुष्टीयुद्ध, गोल्फ, टेनिस, जलतरण, नौकानयन, घोडेस्वारी, रोईंग आणि वेटलिफ्टिंग या खेळातील भारतीय खेळाडू ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे दोन वेळा ऑलिंपिक पदक जिंकणाऱ्या पी व्ही सिंधू या बॅडमिंटनपटूचाही समावेश आहे. यापैकी अनेक खेळाडूंकडून देशाला पदकांची अपेक्षा आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading