Sunday, June 7, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

America: जो बायडेन यांना घ्यावी लागली निवडणुकीतून माघार

वॉशिंग्टन: अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या रिंगणातून विद्यमान अध्यक्ष जो बायडेन यांनी माघार घेतली असून त्यांनी उमेदवारीसाठी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस यांना पाठिंबा दिला आहे. उमेदवारी माघारीसाठी पक्षांतर्गत दबाव, प्रतिस्पर्धी उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यापुढे निभाव न लागणे आणि प्रामुख्याने वाढत्या वयाबरोबर तंदुरुस्तीचा अभाव या प्रमुख कारणांमुळे बायडेन यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली आहे. 

निवडणूक प्रचाराच्या सुरुवातीपासूनच ट्रम्प यांनी बायडेन यांच्यापेक्षा अधिक वेगाने पुढे जाण्यास सुरुवात केली आहे. अध्यक्षीय वादविवादात ट्रम्प यांच्यासमोर बायडेन यांचा निभाव लागलेला नाही. या वादात कमी पडल्यामुळे सर्वसामान्य मतदारांमध्ये बायडेन यांची प्रतिमा डागाळली तर ट्रम्प यांची प्रतिमा उजळली. त्यामुळे बायडेन यांनी या निवडणुकीतून माघार घ्यावी, असा सूर खुद्द डेमोक्रॅटिक पक्षातूनच निघू लागला. 

बायडन यांचे वय तब्बल 81 वर्ष आहे. वयानुसार त्यांच्यामध्ये तंदुरुस्तीचा अभाव जाणवत आहे. अनेकदा तो जाहीरपणे दिसूनही आला आहे. निवडणुकीच्या काळात बायडेन हे चालताना अडखळल्याची, धडपडल्याची छायाचित्रही प्रसिद्ध झाली आहेत. वयानुसार त्यांना विश्वरत्न होत असल्याचेही अनेक वेळा जाहीर कार्यक्रमात दिसून आले. एकदा ते आपणच निवडलेल्या उपाध्यक्ष कमला हॅरीस यांचेच नाव विसरून गेले. इतकेच नाही तर हरीश यांचा उल्लेख त्यांनी ट्रम्प असा केला. नाटोच्या बैठकीत युक्रेनचे राष्ट्रप्रमुख व्लादिमिर झेलेंस्की यांना त्यांनी पुतीन म्हणून संबोधले. 

बायडेन यांच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून सध्याच्या कामगिरीवर मतदार नाखूश असल्याचे दिसून येत आहे. देशासमोरील आर्थिक प्रश्नांसह कोणत्याही समस्येवर बायडेन प्रभावी उपाययोजना करू शकले नाहीत, अशी भावना मतदारांमध्ये दिसून येत आहे. अमेरिकेसार अपेक्षित असणारी आक्रमकता आणि ठाम निर्णयक्षमता बायडेन यांच्यामध्ये दिसून येत नाही अशीही टीका केली जाते. खुद्द माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि अमेरिकन काँग्रेसच्या माजी सभापती नॅन्सी पेलोसी यांनी देखील गार्डन यांच्या उमेदवारीबद्दल नाराजी व्यक्त करून त्यांना माघार घेण्याचे आवाहन केले आहे. 

ट्रम्प यांच्यावर झालेला गोळीबार हा या निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. त्यांच्या हप्त्याच्या असफल प्रयत्नामुळे मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट तयार होणे शक्य आहे. बायडेन यांच्याबद्दलची नाराजी आणि ट्रम्प यांच्याबद्दलची सहानुभूती यामुळे ही निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता निर्माण झाली होती.. अर्थातच बायडेन यांच्यावर माघारीसाठी येत असलेल्या दबावात वाढ झाली. त्यामुळे अखेर बायडेन यांनी निवडणुकीतून माघार घेऊन कमला यांना उमेदवारीसाठी पाठिंबा जाहीर केला. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading