Sunday, June 7, 2026
Latest NewsNATIONAL

घटस्फोट न घेताच दुसरे लग्न केल्याने महिलेला सुप्रीम कोर्टाने दिली शिक्षा

नवी दिल्ली: घटस्फोट न घेताच दुसरे लग्न करणाऱ्या महिलेला सर्वोच्च न्यायालयाने सहा महिने कारावासाठी सजा सुनावली आहे. तिच्या दुसऱ्या पतीलाही अपराधी ठरवून त्यालाही सहा महिन्याची सजा सुनावण्यात आली आहे. या महिलेच्या सहा वर्षाच्या मुलाच्या संगोपनाची समस्या लक्षात घेऊन न्यायालयाने प्रथम या महिलेच्या पतीने शिक्षा भोगावी आणि त्याची सजा पूर्ण झाल्यानंतर महिलेची कारागृहात रवानगी करावी, असा महत्वपूर्ण आदेशही दिला आहे.

पहिले लग्न शाबूत असताना दुसरे लग्न करणाऱ्या महिलेच्या विरोधात तिच्या पहिल्या पतीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. चेन्नई उच्च न्यायालयाने या महिलेला दोषी ठरवून न्यायालय उठेपर्यंत उभे राहण्याची सजा सुनावली.  उच्च न्यायालयाच्या या निर्णयाच्या विरोधात पतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाने ही महिला व तिच्या दुसऱ्या पतीला सहा महिने कारावासाची सजा सुनावली. 

सामाजिक स्वास्थ्य आणि स्थिरतेच्या दृष्टिकोनातून या महिलेने व तिच्या दुसऱ्या पतीने केलेला अपराध गंभीर स्वरूपाचा आहे. अशा अपराधाला किरकोळ न समजता त्याला तितकीच गंभीर शिक्षा दिली गेली पाहिजे, अशी टिप्पणीही न्यायालयाने केली. न्या. सी टी रविकुमार आणि न्या. संजय कुमार यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. 

घटस्फोट न घेता दुसरा विवाह करणे हा किरकोळ अपराध मानून त्याला तितकीच किरकोळ सजा सुनावणे हे समाजाच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर हानिकारकठेवण्यासाठीसामाजिक व्यवस्था आणि न्यायप्रणालीवर समाजाचा विश्वास कायम ठेवण्यासाठी अपराधाची गांभीर्य लक्षात घेऊन त्या प्रमाणात शिक्षा ठोठावणे आवश्यक आहे. कोणत्याही कृत्याचा समाजावर नेमका काय परिणाम होईल याचा विचार न्यायाधीशांनी आपला निकाल देताना केला पाहिजे, असेही खंडपीठाने सुनावले आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading