अखेर ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकरवर कारवाई
पुणे : अखेर वादग्रस्त ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकरांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांचा जिल्हा प्रशिक्षाचा कालावधी स्थगित करण्यात आला असून; येत्या 23 जुलैपर्यंत लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमी, मसुरी येथे हजार राहण्याचे आदेश डीओपीटीने दिले आहेत. अशा प्रकारे ट्रेनी IAS अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आल्याची ही देशातील पहीलीच घटना आहे.
प्रशिक्षण कालावधीत गैरवर्तन
ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी, मसुरी येथून ऑगस्ट 2023 ते एप्रिल 2024 या कालावधीत प्रशिक्षण घेऊन बाहेर पडल्या. त्यानंतर 15 एप्रिल ते 31 मेपर्यंत (सात आठवडे) पुण्यातील यशदा येथे त्यांनी प्रशिक्षण घेतले. अन् 3 जूनपासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशिक्षणाला सुरुवात झाली. ट्रेनी IAS अधिकारी असताना देखील पूजा खेडकर यांनी वारिष्ठांकडे स्वतंत्र दालनाची मागणी केली. तसेच स्वातंत्र्य वाहन व शिपाई मिळत नसल्याने वारिष्ठांकडे तकादा लावणे, महागड्या गाड्यांवर लाल दिवा लावणे असे प्रकार केले. यामुळे संबंधित विभागप्रमुखांनी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्याकडे पूजा खेडकर यांच्या गैरवर्तनाचा अहवाल दिला आहे. तर जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आपला 26 पानी अहवाल केंद्राकडे सादर केला आहे.
