Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

पथारीवाले, पदपथ विक्रेत्यांना मिळाले पावसापासून संरक्षण

पुणे : पावसाळा सुरु झाला असताना शहरातील गरजू विक्रेत्यांना आणि त्यांच्या सामानाला पावसापासून संरक्षण मिळावे आणि त्यांना मदत व्हावी, या उद्देशाने रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या वतीने २४२५ छत्र्यांचे विनामूल्य वाटप करण्यात आले. रोटरीचे प्रांतपाल शीतल शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक ठिकाणी हे वाटप संपन्न झाले.

रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या वतीने आणि रोटरीच्या प्लेइंग इलेव्हन, इकोनॉमिक अँड कम्युनिटी डेव्हलपमेंट व पब्लिक इमेज या तीन विभागांच्या सहकार्याने सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून रोटरी बिबवेवाडी व रोटरी पुणे ईस्ट या क्लब्ज सोबतच क्विक हिल या संस्थेचे विशेष आर्थिक सहकार्य यासाठी लाभले आहे. नुकतेच रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे प्रांतपाल शीतल शहा यांच्या हस्ते या छत्री वाटपाला सुरुवात झाली असून अजय वाघ, विजय काळभोर, प्रसाद गणपुले, मानसी शहा, अभय जोशी, आणि रागिणी शहा आदी यावेळी उपस्थित होते.

रोटरी इंटरनॅशनल ही संस्था १९०५ सालापासून जगभरात अनेक सामाजिक उपक्रम हाती घेत आली आहे.  सदर वर्ष हे रोटरीचे २०२४-२०२५ हे वर्ष असून याचेच औचित्य साधत आम्ही पावसाळ्याच्या या दिवसात गरजू विक्रेत्यांना व त्यांच्या सामानाला संरक्षण मिळावे म्हणून २४२५ छत्र्या विनामूल्य वाटण्याचा निर्णय घेतला असे सांगत शीतल शहा म्हणाले, “पदपथ विक्रेते आणि पथारीवाले यांना यंदाच्या पावसाळ्यात पावसापासून संरक्षण मिळावे आणि भविष्यात उन्हामध्येही त्यांना वापरता येतील अशा छत्र्या आम्ही त्यांना ‘छत्रछाया’ हा उपक्रमा अंतर्गत विनामूल्य उपलब्ध करून देत आहोत. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या तब्बल १०५ क्लब्जने या उपक्रमात सहभाग घेतला आहे. एकाच उपक्रमात इतक्या मोठ्या संख्येने रोटरीचे क्लब सहभागी होणे ही रोटरीच्या इतिहासात एक ऐतिहासिक घटना आहे. आता पुढे क्लब्जच्या माध्यमातून गरजू विक्रेत्यांना या छत्र्यांचे वाटप करण्यात येईल. या अंतर्गत पुणे शहर व जिल्हा, पिंपरी चिंचवड, मावळ, पनवेल आणि रायगड जिल्ह्याचा काही भाग, नाशिक रस्ता, सोलापूर रस्त्यावरील इंदापूर व बारामती इत्यादी ठिकाणी गरजू भाजी व फळे विक्रेते, रस्त्यावर व्यवसाय करणारे गरजू नागरिक यांपर्यंत ही छत्री पोहोचविण्यात आली.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading