Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

अल्पावयीन मुलगी आढळली गळफास घेतलेल्या अवस्थेत; तर मैत्रीण बेशुद्ध अवस्थेत

पुणे : येरवडा परिसरात दोन 16 वर्षीय अल्पवयीन मैत्रिणी एकाच घरात अत्यावस्थेत आढळून आल्या आहेत. त्यातील एक ही गळफास घेतलेल्या अवस्थेत; तर दुसरी मैत्रीण अति मद्यसेवन केल्याने बेशुद्ध अवस्थेत आढळली आहे. या प्रकरणी येरवडा पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तनिषा शांताराम मनोरे (रा. वडार वस्ती, सेवक चौक जवळ, लक्ष्मी नगर येरवडा) असे गळफास घेतलेल्या मृत अल्पवयीन मुलीचे नाव आहे. तर कीर्ती कमलाकर कादगी (रा. नागपूर चाळ, येरवडा) असे बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या मुलीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, वरील दोन्ही ही मुलींनी काल एकत्र दारू पिली होती. तसेच दारू पिऊन उलट्या देखील केल्या होत्या. यावेळी नशेच्या आवस्थेत कीर्ती ने कॉल करून कार्तिक गणेश पिल्ले (वय 16) याला बोलावले होते. मात्र जेव्हा कार्तिक तिच्या घरी पोहोचला तेव्हा तनिषा ही गळफास घेतलेल्या अवस्थेत होती. तर कीर्ती बेशुद्ध अवस्थेत ट्याला दिसून आली.  यावेळी त्याने तनिषाच्या गळ्याला असलेली ओढणी काढून तिला खाली उतरवले व तोंडावर पाणी मारून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. तसेच तनिषाच्या आईला बोलवून आणले.

दरम्यान, अत्यावस्थेत दोघींनाही ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तनिषाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर कीर्ती कादगी हिने अति मद्यसेवन केलेल्याने तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास येरवडा पोलिस करीत आहेत.

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading