‘पुरुषोत्तम’साठी चिठ्ठीद्वारे निवडले 13 संघ
पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित यंदाच्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेसाठी 51 संघांची निवड आज (दि. 15) निश्चित करण्यात आली. नव्याने दाखल झालेल्या 33 संघांमधून 13 संघांची निवड चिठ्ठीद्वारे करण्यात आली आहे.
स्पर्धेचे अर्जवाटप दि. 14 व दि. 15 रोजी करण्यात आले. गेल्यावर्षीच्या स्पर्धेतील 40 पैकी 38 संघांनी प्रवेश अर्ज दाखल केले आहेत. नव्याने 33 संघांनी अर्ज दाखल केले त्यातील 13 संघांची निवड चिठ्ठीद्वारे करण्यात आली. अर्जांची स्वीकृती दि. 3 आणि दि. 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 ते 8 या वेळात 418, नातू वाडा, शनिवार पेठ येथे होणार आहे. आतापर्यंत ज्या संघांनी अर्ज दाखल केले आहेत त्यापैकी कुणी या दिवशी गैरहजर राहिल्यास इतर संघांची चिठ्ठीद्वारे निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्रीय कलोपासकचे चिटणीस ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी दिली.
स्पर्धेचे वेळापत्रक
दि. 7 ऑगस्ट रोजी लॉटस् : स्थळ : इंदिरा मोरेश्वर सभागृह, डीएसके चिंतामणी
दि. 16 ते दि. 30 ऑगस्ट : पुणे केंद्राची प्राथमिक फेरी
दि. 21 व दि. 22 सप्टेंबर : पुणे केंद्राची अंतिम फेरी
दि. 28 सप्टेंबर : पुणे केंद्राचा पारितोषिक वितरण समारंभ
चिठ्ठीद्वारे निवडलेली महाविद्यालयीन संघ
एस. एम. जोशी महाविद्यालय, हडपसर
सिंहगड अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग
एन. बी. एन. सिंहगड टेक्निकल इस्टिट्यूट, कॅम्पस आंबेगाव बुद्रुक
इंटरनॅशनल इस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, हिंजवडी
विश्वासराव रणसिंग महाविद्यालय, इंदापूर
कावेरी कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पुणे
डी. वाय. पाटील युनिटेक बी. स्कूल, ताथवडे
नौरोसजी वाडिया कॉलेज, पुणे
पी. डी. ई. ए. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग
एम. आय. टी. डब्ल्यू. पी. यू., पुणे
अजिंक्य डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग, लोहगाव
डी. वाय. पाटील ज्ञानप्रसाद युनिर्व्हसिटी, बी. स्कूल, ताथवडे
गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स, ऑटोनॉमस, पुणे
