Friday, September 25, 2026
BusinessLatest News

स्पार्क मिंडा फाउंडेशनच्या कौशल्य विकास आणि दिव्यांग लोकांच्या सशक्तीकरण केंद्राचे उद्घाटन 

पुणे– स्पार्क मिंडा ग्रुपची कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) शाखा, स्पार्क मिंडा फाउंडेशनने (एसएमएफ), राजगुरुनगर, पुणे येथे आपल्या आकर्षण कौशल्य विकास कार्यक्रम आणि सक्षम – दिव्यांग सशक्तीकरण (पीडब्ल्यूडी) केंद्र सुरू करण्याची अभिमानाने घोषणा केली. हे केंद्र मोठ्या समुदायाशी जोडले जाण्यासाठी, मजबूत समुदाय संबंध निर्माण करण्यासाठी आणि विविध उपक्रमांद्वारे व्यक्तींना सक्षम बनवण्याच्या त्यांच्या मिशनमधील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. दोंदे आदिवासी गाव 100 टक्के डिजिटल साक्षर करण्याच्या यशस्वी प्रयत्नानंतर, फाऊंडेशन आता आणखी एका क्षेत्राकडे आपला हात पुढे करत आहे, जे राज्यातील वंचित समुदायाची सेवा करण्यासाठी धोरणात्मकरित्या ओळखले गेले होते. आजपर्यंत, स्पार्क मिंडा फाउंडेशन ने 70% रोजगार आणि उद्योजकता दरासह 15,000 पेक्षा जास्त वंचित तरुण आणि महिलांना कौशल्य प्रशिक्षण दिले आहे आणि 21,000 पेक्षा जास्त दिव्यांग लोकांना सक्षम केले आहे.

अशोक मिंडा, जीसीईओ आणि चेअरमन, स्पार्क मिंडा ग्रुप म्हणाले, “स्पार्क मिंडा फाऊंडेशन आणखी समुदायांपर्यंत पोहोचण्यासाठी आपले उपक्रम वाढवण्यासाठी कटिबद्ध आहे. आम्ही आमच्या आकर्षण आणि सक्षम कार्यक्रमांच्या यशाची इतर ग्रामीण भागांमध्ये पुनरावृत्ती करण्याची, फूटप्रिंटचा विस्तार करण्याची आणि व्यक्तींना सक्षम बनवण्याचे आणि शाश्वत समुदाय विकासाला चालना देण्याचे आमचे ध्येय पुढे सुरू ठेवण्याची योजना आखत आहोत.”

सारिका मिंडा, चेअरपर्सन, स्पार्क मिंडा फाऊंडेशन, म्हणाल्या की, ” या नवीन केंद्रात, आम्ही 21 व्या शतकातील कौशल्यांनुसार विविध टेक्निकल कौशल्ये देणे सुरू ठेवू, ज्यामुळे रोजगाराच्या सुविधा उपलब्ध होतील आणि जीवनाचा दर्जा सुधारेल. आम्ही आमच्या सर्वसमावेशक केंद्राद्वारे दिव्यांग लोकांना आवश्यक सहाय्यक उपकरणे, कौशल्ये आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न करतो.”

आकर्षण आणि सक्षम केंद्र सुरू करण्याचा प्राथमिक उद्देश यामध्ये अधिकाधिक लोकांना सहभागी करून घेणे आणि शाश्वत समुदाय विकासाला चालना देणे आहे. कौशल्य वृद्धी आणि सक्षमीकरणाचे केंद्र म्हणून काम करून, समाजामध्ये आत्मनिर्भरता आणि शाश्वत विकासाला चालना देण्याचा या केंद्राचा उद्देश आहे. नवीन केंद्र धोरणात्मकदृष्ट्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर स्थित आहे, जे मोठ्या वंचित समुदायापर्यंत पोहोचण्याची खात्री देते.

आकर्षण कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून, स्पार्क मिंडा फाउंडेशनने समुदायाला कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ते स्पोकन इंग्लिश, ब्युटी अँड वेलनेस, कटिंग अँड टेलरिंग, कॉम्प्युटर आणि टॅली या विषयातील कोर्सेस उपलब्ध करून देतात. हे कोर्सेस कौशल्य वाढवण्यासाठी, रोजगाराच्या संधींमध्ये मदत करण्यासाठी आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी तयार केले गेले आहेत. आकर्षण कौशल्य विकास कार्यक्रम 2013 मध्ये सुरू करण्यात आला आणि आज ते भारतातील 5 राज्यांमध्ये कार्यरत आहे.

सक्षम – दिव्यांग सशक्तीकरण कार्यक्रम दिव्यांग लोकांना यूडीआईडी रजिस्ट्रेशन सहाय्य तसेच कृत्रिम अवयव, कॅलिपर, स्टिक्स, वॉकर आणि व्हीलचेअर यांसारखी सहाय्यक उपकरणे देऊन त्यांना मदत करतो. याव्यतिरिक्त, ते सक्षम आणि आकर्षण केंद्रातील  विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देतात, ज्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समावेशकता आणि सक्षमीकरणाला चालना मिळते. सक्षम कार्यक्रम 2015 मध्ये सुरू करण्यात आला होता आणि तो भारत, इंडोनेशिया आणि व्हिएतनाममधील लोकांपर्यंत पोहोचला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading