ट्रेंड मायक्रोच्या पुण्यातील टप्प्यादरम्यान सायबरसुरक्षेतील नाविन्य आणि स्थानिक सहभागाप्रती बांधिलकी अधोरेखित
पुणे – ट्रेंड मायक्रो या सायबरसुरक्षा क्षेत्रातील जागतिक आघाडीच्या कंपनीने भारतातील रिस्क टु रिझिलियन्स वर्ल्ड टुरची पुणे विभागात यशस्वी सांगता केली. या कार्यक्रमासाठी ३५ कंपन्यांतील ६० जणांनी उपस्थित राहात सात शहरांत करण्यात आलेल्या टुरचा ऐतिहासिक टप्पा अधोरेखित केला. ही टुर गेल्या वर्षाप्रमाणे ६० देशांमधील जागतिक ठिकाणी जाणार असून त्यात पाच प्रमुख भारतीय शहरांचा समावेश आहे.
‘इनोव्हेशन मीट्स अड्रेनलाइन’ अशी मध्यवर्ती संकल्पना असलेल्या या कार्यक्रमात आधुनिक सायबर रिसिलियन्स, एक्सटेंडेड डिटेक्शन अँड रिस्पॉन्सचा (एक्सडीआर) अटॅक सरफेस रिस्क मॅनेजमेंटसह (एएसआरएम) समावेश आणि क्लाउड रिस्क मिटीगेशनसाठी प्रभावी धोरणे या विषयांवर चर्चा करण्यात आली.
ट्रेंड मायक्रोमधील भारत व सार्कच्या देश व्यवस्थापक शारदा टिक्कू ट्रेंड मायक्रोसाठी पुण्याचे धोरणात्मक महत्त्व विशद करतम्हणाल्या, ‘या भागातील आमची लक्षणीय प्रगती ट्रेंड मायक्रोचे विकास, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि स्थानिक सहभाग यांप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित करणारी आहे. जागतिक सुरक्षा क्षेत्रातील ट्रेंड्स उदयास येत असतानाच स्थानिक व्यवसायांना सर्वसमावेशक आयटी व्हिजिबिलिटी हवी आहे तसेच तंत्रज्ञान बळकट करणे, इतर सायबरसुरक्षा उत्पादनांसह सहजपणे समावेश करणे, फॉल्स पॉझिटिव्ह्जची संख्या कमी करणे आणि सायबरसुरक्षा रिसिलियन्स वाढवणे यांचीही त्यांना गरज असते. आमचे एएसआरएम या उद्योगांना जास्त चांगली दृश्यमानता, सक्रिय जोखीम व्यवस्थापन आणि मजबूत सुरक्षा देत सक्षम करते. या बाजारपेठेतील आघाडीच्या आयटी आणि आर्थिक कंपन्याही आमच्या जेन- एआय पॉवर्ड ट्रेंड व्हिजन वन प्लॅटफॉर्मवर विश्वास ठेवतात. हा प्लॅटफॉर्म त्यांना ऑन- प्रीमायसेस, क्लाउड आणि हायब्रीड वातावरणात सहजपणे आपली व्याप्ती वाढवणे शक्य करतो, कारण त्यामध्ये जोखीम सहज ओळखता येते तसेच त्यावर योग्य कृती सांगितली जाते.’
या कार्यक्रमात परिसंवादाचा समावेश करण्यात आला होता व त्यात किर्लोस्कर समूहाचे समूह सीआयएसओ माणिकराव पाटील आणि बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स, सीआयएसओ सोलकर नागराज यांचा समावेश होता. ‘सायबर कन्सॉलिडेशन आणि कम्युनिकेशनसाठी योग्य धोरणे’ या विषयावर त्यात चर्चा करण्यात आली. ट्रेंड मायक्रोच्या एंटरप्राइज व्यवसायाच्या पश्चिम विभागाचे प्रदेश प्रमुख कुणाल किमतकर यांनी या परिसंवादाचे मॉडरेशन केले. ट्रेंड मायक्रोच्या आरटुआर कार्यक्रमात माणिकराव पाटील यांनी सीआयएसओजनी मलिशियस अॅक्टर्सवर प्रतिहल्ला करण्यासाठी परस्पर सहकार्य करण्याची गरज असल्याचे आणि एकमेकांशी वाटून घेतलेल्या ज्ञानामुळे संरक्षक धोरणे उंचावतात असे सांगत त्याचे महत्त्व अधोरेखित केले. सोलकर नागराज यांनी उच्च जोखीम असलेल्या वातावरणात आयटी सिक्युरिटी कन्सॉलिडेशनची आवश्यक आणि महत्त्वाची भूमिका ठळकपणे मांडली. जनरेटिव्ह एआयचे फायदेतोटे मांडताना वक्त्यांनी कोणतेही क्षेत्र असले, तरी जनरेटिव्ह एआयचा वापर योग्य सीमारेषा आखून करायला हवे असे नमूद करत सांगता केली. कर्मचारी टिकवून ठेवण्याच्या बाबतीत माणिकराव यांनी करियरमधील प्रगतीची योग्य आखणी केल्यास कुशल मनुष्यबळ राखण्यासाठी मौल्यवान संधी मिळतात असे सांगितले, तर सोलकर यांनी शिकण्याची इच्छाही महत्त्वाची असल्याचे नमूद केले.
ट्रेंड मायक्रो अहवालात भारत जागतिक पातळीवर रॅन्समवेयर हल्ला होण्याची सर्वाधिक शक्यता असलेल्या देशांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर असून देशातील उत्पादन, सरकारी खाती, बँकिंग क्षेत्राला मालवेयरचा सर्वात जास्त धोका आहे. सायबरहल्ल्यांच्या वाढत्या गुंतागुंतीला तोंड देण्यासाठी विशेषतः जनरेटिव्ह एआय वाढत असताना ट्रेंड मायक्रोने आपली रिझिलियन्स वर्ल्ड टुर यंदा सात शहरांत विस्तारली आहे. या विस्ताराद्वारे कंपनीतील रिझिलियन्स वाढवण्यासाठी आधुनिक धोरणे शेयर करण्याचे आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या भागिदारी तयार करण्याचे ध्येय आहे.
ट्रेंड मायक्रोने डेटा सेंटर्ससाठी एआय- पॉवर्ड सायबरसिक्युरिटी टुल्स विकसित करण्यासाठी नुकतीच एनव्हिडियासह भागिदारी जाहीर केली आहे.
