Tuesday, August 4, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

आता तिप्पट वेगाने आणि तिप्पट ऊर्जेने काम करणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी

मॉस्को :  रशियाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या सरकारसाठी तीन या आकड्याचे महत्व सांगतानाच आपले सरकार आता तिप्पट वेगाने आणि तिप्पट ऊर्जेने काम करणार असल्याचे रशियातील भारतीय समुदायाला संबोधित करताना नमूद केले. 

आपण बरोबर एक महिन्यापूर्वी 9 तारखेला तिसऱ्या वेळी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्याच वेळी हा निश्चय केला होता की आता तिप्पट ऊर्जेने काम करायचे आहे. आपल्या सरकारसाठी, निश्चित केलेल्या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी तीन या संख्येला महत्व आहे, असे मोदी म्हणाले. 

आपल्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात भारताला जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याचप्रमाणे देशातील गोर गरीब जनतेसाठी 3 कोटी घरांची उभारणी करण्याचा आमचा निश्चय आहे, असे मोदी म्हणाले. 

भारतातील बचत गटात काम करणाऱ्या महिलांपैकी 3 कोटी महिलांना लखपती बनविण्याचे लक्ष्यही आपल्या सरकारने ठेवले आहे. बचत गटाच्या माध्यमातून काम करणाऱ्या 3 कोटी महिलांचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपर्यंत वाढावे,, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असे मोदी यांनी सांगितले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading