Monday, June 15, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला रीतसर देणग्या स्वीकारण्याची परवानगी

नवी दिल्ली:   राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला रीतसर देणग्या स्वीकारण्याची परवानगी देऊन निवडणूक आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाबद्दल पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाचे आभार मानले आहेत. 

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर संख्याबळाच्या आधारे निवडणूक आयोगाने अजित पवार यांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस  पक्ष असल्याचा निकाल दिला होता. या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. अजित पवार यांच्या गटाला अधिकृत पक्षाचा दर्जा देतानाच निवडणूक आयोगाने शरद पवार गटावर देणग्या स्वीकारण्यास बंदी घातली होती. ती उठवण्याची विनंती करण्यासाठी सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाला भेट दिली.

 विधानसभा निवडणुकीसाठी पांढऱ्या पैशांचा वापर करता यावा, निवडणूक पारदर्शीपणे लढण्यात यावी, या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने निवडणूक आयोगाकडे देणग्या स्वीकारण्यास परवानगी देण्याची मागणी केली. निवडणूक आयोगाने पक्ष कोणाचा याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल मिळेपर्यंत लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 नुसार शरद पवार गटाला देणग्या स्वीकारण्यास परवानगी दिली आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading