‘या’ मुस्लिम महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यापासून वगळावे – प्रकाश महाजन
मुंबई: दोन पेक्षा अधिक अपत्य असलेल्या, विशेषतः दोन पेक्षा अधिक अपत्य असलेल्या मुस्लिम महिलांना मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी या योजनेचा लाभ घेण्यापासून वगळावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी केली आहे. घोषणा झाल्यापासूनच वादात सापडलेल्या या योजनेवरील वादांमध्ये महाजन यांच्या या मागणीमुळे अधिकच भर पडणार आहे.
मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी ही योजना वादग्रस्त ठरली आहे आगामी विधानसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून मतदारांना, विशेषतः महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही योजना जाहीर करण्यात आली असल्याचा विरोधकांचा आक्षेप आहे. मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले असले तरीही या योजनेची निरंतर अंमलबजावणी करणे सरकारला शक्य नाही. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यास कालमर्यादा घालण्यात आली आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे.
विरोधकांच्या आक्षेपांची धार कमी करण्यासाठी सरकारकडून या योजनेस पात्रतेचे निकष अ मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजना धिकारी शिथिल करण्यात येत आहेत. महिलांकडून विशेषतः ग्रामीण भागात या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. या योजनेचा अर्ज दाखल करण्यासाठी विविध शासकीय कार्यालयांवर महिलांची झुंबर उठताना दिसून येत आहे या पार्श्वभूमीवर मनसे नेते महाजन यांनी केलेल्या मागणीला सरकार काय प्रतिसाद देणार, याकडे समाजाचे लक्ष आहे
