Sunday, June 7, 2026
BusinessLatest NewsPUNE

जे.के. सुपर सिमेंट तर्फे फरासखाना पोलीस स्टेशनला २० बॅरीकेट्स भेट

 

पुणे २ जुलै २०२४ : मा. श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी पोलीस दलासाठी स्वयंसेवी संघटना व दानशूर व्यक्ति यांचेकडून दैनंदिन कायदा व सुव्यवस्थेसाठी लागणाऱ्या आवश्यक बाबींकरीता मदत घेणेबाबत केलेल्या सुचना व आव्हानावरून फरासखाना पोलीस ठाणे अंकीत असलेल्या स्वयंसेवी संघटना व दानशूर व्यक्तिंना आव्हान करण्यात आलेले होते सदर आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देवून जे.के. सुपर सिमेंट कंपनीचे, कोरेगाव पार्क शाखा यांचेवतीने त्यांचे जाहिरात खर्चाचे बजेट मधुन आगामी श्री. संत तुकाराम महाराज व श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा व गणेशोत्सव सणाचे अनुषंगाने शहराचे मध्यवर्ती ठिकाणी होणारी गर्दी, वाहतूक नियमनाकरीता २० बॅरीकेट्स देण्याची तयारी दर्शवून त्याप्रमाणे चर्चा करून पोलीसांना आवश्यक असलेले बॅरिकेट देण्याचा निर्णय घेतला.
त्याप्रमाणे जे. के. सुपर सिंमेंट कंपनीचे  केदार शहागडकर,  राजेश देशपांडे,  मुकुंद देशपांडे,  अभय पुजारी,  जयसिंग कदम,  प्रविण कुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग,  संदिपसिंह गिल्ल, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -१.    मच्छिंद्र खाडे, सहा पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग पुणे शहर.   प्रशांत भस्मे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फरासखाना पोलीस स्टेशन पुणे शहर,   अजित जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) फरासखाना पोलीस स्टेशन पुणे शहर, गोपनिय पथकाचे अमंलदार पोहवा १७२७ जगताप व पोशि ९१४९ औटी यांचे उपस्थितीत २० बॅरेकेड हस्तांतरीत केलेले आहेत. कंपनीमार्फत पुणे पोलीस दलास केलेबाबत त्यांचे सहर्ष आभार व इतर स्वयंसेवी संघटना व दानशूर व्यक्ति यांना मदतीचे आव्हान करण्यात येत आहे.
या व्यतिरिक्त जे के सिमेंट कंपनी तर्फे आळंदी देवस्थान , पंढरपूर देवस्थान आणि पंढरपूर पोलीस यांना देखील आषाढी वारीच्या अनुषंगाने बॅरीगेट देण्यात आले जे वारी दरम्यान गर्दी, वाहतूक नियमनाकरीता उपयोगात येतील

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading