Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

नेक्स्ट जेन करिअर फेस्ट प्रदर्शनाचे आयोजन

 

पुणे : अस्पायर नॉलेज ॲन्ड स्किल्स, संवाद पुणे आणि हाऊस ऑफ सक्सेसतर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचे रिसर्च पार्क फाऊंडेशन, पुणे मॅनेजमेंट असोसिएशन, भावार्थ यांच्या सहकार्याने दि. 24 ते 26 मे या कालावधीत नेक्स्ट जेन करिअर फेस्ट प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवसीय करिअर फेस्ट प्रदर्शनामध्ये तज्ज्ञांची व्याख्याने, परिसंवाद आयोजित करण्यात आले असून दहावी-बारावीनंतर करिअर याविषयी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती अस्पायर नॉलेज ॲन्ड स्किल्सचे संजय गांधी, संवाद पुणेचे सुनील महाजन, हाऊस ऑफ सक्सेसचे प्रसाद मिरासदार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिसर्च पार्क फाऊंडेशनचे इनोव्हेशन ऑफिसर अजिंक्य तेरकर, पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप तुपे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. भावार्थच्या व्यवस्थापक कीर्ती जोशी उपस्थित होत्या.
तीन दिवसीय करिअर फेस्ट प्रदर्शन बालगंधर्व रंगमंदिरातील कलादालनात होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. करिअर फेस्ट प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार, दि. 24 राजी सकाळी 10:30 वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. अपूर्वा पालकर, डोमेस्टिक वर्कर्स सेक्टर स्किल कौन्सिलच्या सीईओ मोना गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. आयसर कोलकाता गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन डॉ. अरविंद नातू अध्यक्षस्थानी असतील.
‌‘भावार्थ‌’तर्फे डॉ. भूषण केळकर आणि डॉ. मधुरा केळकर यांच्या ‌‘करियरची गुणसूत्रे‌’ पुस्तकावर आधारित ‌‘एआय युगात..! चला, करियर घडवू‌’ या विषयावर प्रदर्शन भरविण्यात येणार असून याची संकल्पना व लेखन प्रसाद मिरासदार यांचे आहे. एआय चित्रे माधवी नाडकर्णी यांनी रेखाटलेली आहेत. तर मांडणी रोहित कुलकर्णी यांची आहे. प्रदर्शनास येणाऱ्या व नोंदणी करणाऱ्या प्रत्येकची फाईंड युवर फिट या संस्थेतर्फे मोफत सक्सेस फिट लर्निंग टेस्ट करण्यात येणार आहे.
दुपारी 12 वाजता ‌‘आधुनिक तंत्रज्ञान आणि करियरची गुणसूत्रे‌’ या विषयावर न्यूफ्लेक्स टॅलेंट सोल्यूशन्स प्रा. लि.चे अध्यक्ष डॉ. भूषण केळकर यांचे व्याख्यान होणार असून महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे चीफ मेंटॉर विवेक सावंत अध्यक्षस्थानी असणार आहेत. ‌‘दहावी व बारावीनंतरचे करियर‌’ या विषयावर सायंकाळी 5:30 वाजता सुप्रसिद्ध करियर काऊन्सेलर आणि सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांचे व्याख्यान होणार आहे. सायंकाळी 6.30 वाजता ‌‘हटके करियर : युट्यूबर्स आणि इन्फ्लुएंसर्सचे‌’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यात उर्मिला निंबाळकर, सुकीर्त गुमास्ते आणि मधुरा बाचल यांचा सहभाग असणार आहे.
शनिवार दि. 25 रोजी सकाळी 10.30 वाजता परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून ‌‘करियर आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण‌’ या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु व शिक्षण धोरण सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन करमाळकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रीसर्च पार्क फाऊंडेशनचे सीइओ डॉ. अरविंद शाळीग्राम, शिरूरच्या सी. टी. बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते, अस्पायर नॉलेज ॲन्ड स्किल्सचे अध्यक्ष डॉ. संजय गांधी, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे डॉ. मिलिंद वाकोडे बोलणार आहेत. अध्यक्षस्थानी खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे एकल महाराष्ट्र तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुनील भिरुड उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी 5.30 वाजता ‌‘करियरच्या वेगळ्या वाटा‌’ या विषयावर सुप्रसिद्ध करियर कौन्सेलर विजय नवले यांचे व्याख्यान होणार असून पुणे विद्यार्थी गृहाच्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाचे संचालक सुनील रेडेकर अध्यक्षस्थानी असणार आहेत. सायंकाळी 6.30 वाजता ‌‘माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रातील करियर संधी‌’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील आधुनिक विज्ञान आणि व्यावसायिक कौशल्य विभागाच्या डीन डॉ. उज्ज्वला बर्वे, चित्रपट दिग्दर्शक मिलिंद लेले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. संजय तांबट, चित्रपट दिग्दर्शक प्रसाद नामजोशी, मराठवाडा मित्र मंडळ पत्रकारिता विभागाचे संचालक संतोष शेणई यांचा सहभाग असणार आहे.
रविवार, दि. 26 मे रोजी सकाळी 10.30 वाजता ‌‘इंटरनॅशनल करियर्स‌’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले असून महर्षी फाऊंडेशन टेक्नॉलॉजीचे सीइओ मरियम लॉज प्रमुख वक्ते आहेत. पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे डॉ. गिरीश देसाई यांची प्रमुख उपस्थिती असणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. कारभारी काळे अध्यक्षस्थानी असणार आहेत.
सकाळी 11.30 वाजता ‌‘इंटरनॅशनल करियरसाठी तयारी‌’ या विषयावर फाईंड युअर फिटचे सीइओ डॉ. जितेंद्र सांडू यांचे एआय ड्रिव्हन लर्निंग स्टाईल : कॉलेब्रेशन फॉर सक्सेस या विषयावर व्याख्यान होणार आहे. दुपारी 12.30 वाजता ‌‘नाटक व मालिकांमधील हटके करियर‌’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात निर्मिती सावंत, पुष्कर श्रोत्री, क्षितिज पटवर्धन, अभिनय बेर्डे, जयवंत वाडकर, ‌‘आज्जीबाई जोरात‌’ या पहिल्या एआय महानाटकाच्या टीमचा सहभाग असणार आहे.
सायंकाळी 5 वाजता पुणे मॅनेजमेंट असोसिएशनच्या फाऊंडेशन डे निमित्त ‌‘एआय आणि करियर्स‌’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून एआय तज्ज्ञ अमेय पांगारकर मार्गदर्शन करणार आहेत. पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप तुपे यांची प्रमुख उपस्थिती असणार असून अध्यक्षस्थानी पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे अध्यक्ष बाळ पाटील असणार आहेत.
तीनही दिवस सीओईपी टेक्नॉलॉजी युनिर्व्हसिटीच्या डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज्‌‍चे मुख्य प्रा. डॉ. अरुण मुडबिद्री हे दुपारी 2 ते 4 या वेळात मोफत करिअर कौन्सिलिंग करणार आहेत.
सायंकाळी 6 वाजता तीन दिवसीय करिअर फेस्ट प्रदर्शनाचा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला असून ‌‘राष्ट्रसेवेसाठी करियर आणि समृद्ध व्यक्तिमत्व‌’ या विषयावर माजी प्रशासकीय अधिकारी अविनाश धर्माधिकारी बोलणार आहेत.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading