Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

सद्गुरु श्री जंगली महाराज समाधीस चंदन उटी लेपन

श्री जंगली महाराज देवस्थान तर्फे आयोजन

पुणे : श्री जंगली महाराज देवस्थान तर्फे सद्गुरु श्री जंगली महाराज समाधीस चंदन उटी लेपनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. गुढीपाडव्यापासून हनुमान जयंती पर्यंत १३४ वा जंगली महाराज पुण्यतिथी उत्सव व्याख्याने व संगीत कार्यक्रम, महिलांचे भजने असा भरगच्च कार्यक्रमांनी पार पाडला.

सद्गुरु श्री जंगली महाराजांच्या समाधीस चंदन उटी लेपन लावून त्याची सांगता झाली. श्री सद्गुरू जंगली महाराज भजनी मंडळ हे महाराजांनी स्थापन केलेले आहे. महाराजांच्या समाधी दिनी परंपरागत ग्रामदैवत रोकडोबा मंदिर येथून श्री सद्गुरू जंगली महाराज भजनी मंडळ महाराजांची पालखी घेऊन महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी म्हणजेच जंगली महाराज मंदिरात येते व तेथे परंपरागत भजन केले जाते. या सोहळ्यास महाराजांच्या अनेक मठातून शेकडो भाविक उपस्थित असतात.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading