साई एमजे स्पोटर्स अॅकॅडमी, स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लिनिक संघांचा दुहेरी विजय !!
पुणे : स्पोटर्सफिल्ड मॅनेजमेंट तर्फे आयोजित तिसर्या ‘स्पोटर्सफिल्ड करंडक’ अजिंक्यपद १२ वर्षाखालील २५-२५ षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत साई एमजे स्पोटर्स अॅकॅडमी आणि स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लिनिक या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला.
शाहु महाविद्यालय येथील सनराईज क्रिकेट अॅकॅडमीच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत विरेन अटोळे याने फटकावलेल्या नाबाद १५२ धावांच्या खेळीमुळे साई एमजे स्पोटर्स अॅकॅडमीने फल्लाह क्रिकेट अॅकॅडमीचा २३० धावांनी धुव्वा उडविला. पहिल्यांदा फलंदाजी करताना साई एमजे स्पोटर्स अॅकॅडमीने २६९ धावांचा डोंगर उभा केला. विरेन अटोळे याने ७९ चेंडूमध्ये २४ चौकार आणि १ षटकारासह नाबाद १५२ धावांची खेळी केली. त्याला शुभम पानसे (४५ धावा) आणि हृषीकेश देशपांडे (२० धावा) यांनी सुरेख साथ दिली. विरेन आणि शुभम यांनी तिसर्या गड्यासाठी १३२ चेंडूत २३८ धावांची भागिदारी केली. या आव्हानासमोर फल्लाह क्रिकेट अॅकॅडमीचा डाव ३९ धावांवर गडगडला.
कार्तिक पासलकर याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लिनिकने २२ याडर्स अॅकॅडमीचा ८ गडी राखून पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना २२ याडर्स अॅकॅडमीला केवळ ६९ धावा करता आल्या. स्पेशलाईज्ड संघाच्या राजीव बरद याने ३ गडी तर, कार्तिक पासलकर आणि प्रत्युश निवंगुणे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लिनिकने हे लक्ष्य ९.५ षटकात पूर्ण केले. साईराज दुरकर (३७ धावा) आणि अविष्कार पाटोळे (नाबाद २३ धावा) यांनी संघाला सहज विजय मिळवून दिला.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
साई एमजे स्पोटर्स अॅकॅडमीः २५ षटकात ३ गडी बाद २६९ धावा (विरेन अटोळे नाबाद १५२ (७९, २४ चौकार १ षटकार), शुभम पानसे ४५, हृषीकेश देशपांडे २०, वेदांत कुंभार १-४२);(भागिदारीः तिसर्या गड्यासाठी विरेन आणि शुभम यांच्यात २३८ (१३२) वि.वि. फल्लाह क्रिकेट अॅकॅडमीः १२.२ षटकात १० गडी बाद ३९ धावा (दनिश फल्लाह ६, सोहम शिंदे ७, शिवम मुळे २-११, कृष्णा भुरटूकणे २-२); सामनावीरः विरेन अटोळे;
२२ याडर्स अॅकॅडमीः १७.५ षटकात ९ गडी बाद ६९ धावा (विकास डोंग्रा १५, राजीव बरद ३-१०, कार्तिक पासलकर २-९, प्रत्युश निवंगुणे २-१०) पराभूत वि. स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लिनिकः ९.५ षटकात २ गडी बाद ७२ धावा (साईराज दुरकर ३७, अविष्कार पाटोळे नाबाद २३, अन्वित दवांगे १-१०); सामनावीरः कार्तिक पासलकर;
