Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

त्यावेळी अजितदादांना मुख्यमंत्री केलं असतं, तर…. शिवतारेंनी केला गौप्यस्फोट

बारामती : देशात सर्वात जास्त लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात येत्या ७ मे रोजी मतदान होत आहे. याठिकाणी महायुतीकडून सुनेत्रा पवार तर महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यातच सुनेत्रा पवार यांच्यासाठी महायुतीचे सर्वच नेते झपाटून कामाला लागले आहेत. तर दुसऱ्या बाजूला सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते कामाला लागले आहेत. अशातच शिंदे गटातील नेते विजय शिवतारे यांनी शरद पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

विजय शिवतारे म्हणाले की, 2004 साली राज्यात राष्ट्रवादीचे सर्वात जास्त आमदार निवडून आले होते. त्यावेळी मी देखील राष्ट्रवादीत होतो. त्या दिवशी आम्ही रात्री अकराच्या फ्लाईटची तिकिट काढली होती. डॉ. महाजन, शिवाजीराव नलावडे, गटनेते रवींद्र पवार, मुबारक खान यांच्यासही मी असे पाच जण शरद पवारांची वेळ घेऊन आम्ही दिल्लीत गेलो होतो.

त्यावेळी साहेबांना आम्ही सांगितले की चांगला कर्तृत्व माणूस अजित पवार आहेत. त्यांना आपण मुख्यमंत्री करायला हवेत. मुख्यमंत्री पद आपल्याला घ्यायला हवे. त्यावेळी कॉंग्रेस मोठा भाऊ आहे. आपण जास्तीची खाती घेऊ असं म्हणून शरद पवारांनी हा मुद्दा झटकून दिला होता. त्यावेळी जर अजितदादांना मुख्यमंत्री केलं असतं. तर आजचं चित्र वेगळं असतं आणि ही परिस्थिती आली नसती. असेही विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading