हडपसरमध्ये आढळरावांच्या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
हडपसर : राज्यात लोकसभेच्या चौथ्या टप्यात मतदान होत असलेल्या मतदार संघात काल अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. आता या टप्यातील लढती स्पष्ट झाल्या आहेत. यामुळे प्रचाराला आता वेग आला आहे, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ नुकतीच हडपसर विधानसभा मतदारसंघातील मांजरी, माळवाडी, १५ नंबर, साडेसतरानळी या परीसरात भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत समर्थन दाखवले.
हडपसर मधील हजारो नागरिकांनी या भव्य रॅलीला अभूतपूर्व असा प्रतिसाद देत ठिकठिकाणी औक्षण व स्वागत करीत महायुतीचाच विजय होणार याची ग्वाही दिली. उन्हाचा पारा वाढलेला असतानाही रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनी महायुतीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.
रॅलीला महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश आण्णा घुले, माजी आमदार योगेश टिळेकर , शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे, मनसेचे शहरप्रमुख साईनाथ बाबर व महायुतीच्या सर्व पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
