Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

शेतकरी कृती समितीचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा

बारामती : लोकसभेच्या तिसऱ्या टप्याची मतदान तारीख जसजशी जवळ येत आहे तसे राजकीय वातावरण तापत आहे. बारामती लोकसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रकाराचा झंझावात सुरू आहे.  बारामती मधील शेतकरी कृती समितीने सुनेत्रा पवार यांना आपला पाठिंबा जाहीर केला असून यामुळे महायुती अधिक भक्कम झाली आहे.

गडदरवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस, महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांच्या नेतृत्वात  सोमेश्वर कारखाना कार्यक्षेत्रातील महायुतीचे कार्यकर्ते व शेतकरी कृती समिती यांचा संयुक्त मेळावा झाला. यानिमित्ताने सतीश काकडे यांनी काकडे गट व शेतकरी कृती समितीचे कार्यकर्ते सुनेत्रा पवार यांना बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी बोलताना सतीश काकडे म्हणाले, ‘‘अजित पवार शब्दाचे पक्के नेते आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात विकासाची गंगा, मोठे प्रकल्प आणण्यासाठी केंद्राच्या निधीची गरज आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी त्यांची जवळीक आहे. त्यामुळे अजित पवार विकासकामे खेचून आणतील. यासाठी सुनेत्रा पवार यांना खासदार करणे आवश्यक आहे,’’

याप्रसंगी प्रमोद काकडे, दिलीप फरांदे, संतोष कोंढाळकर, अजय कदम, शहाजी जगताप, दिग्विजय जगताप, वैभव गायकवाड, हेमंत गायकवाड, सतीश जगताप, भाऊसाहेब हुंबरे, दयानंद चव्हाण, बबलू सकुंडे, सुरेश शेंडकर, हरिभाऊ तावरे, बाळासाहेब राऊत, भाऊसाहेब भोसले, अजित माळशिकारे आदी उपस्थित होते. अभिजित काकडे यांनी मेळाव्याचे संयोजन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading